शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्या कुटुंबाचा आहार कोणता, प्रगणक विचारणार प्रश्न; तब्बल १५ वर्षांनंतर जनगणनेचा बिगुल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 12:50 IST

नवे नकाशे, प्रगणकगट तयार करण्याचे काम युद्धपातळीवर; प्रक्रियेत प्रथमच ‘डिजिटल’ टच

जालना : कोरोना प्रादुर्भाव आणि विविध प्रशासकीय कारणांमुळे लांबणीवर पडलेली जनगणना आता तब्बल १५ वर्षांनंतर प्रत्यक्ष मार्गावर आली आहे. केंद्र सरकारच्या घोषणेनुसार, येत्या १ एप्रिलपासून जनगणनेच्या कामाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर, जालना जिल्हा प्रशासनाने प्राथमिक तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यात जनगणना प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यामध्ये घर यादी व घरगणना ही कामे हाती घेण्यात येणार आहेत. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रश्नावलीनुसार, कोणता आहार सेवन करता, याविषयीची माहिती प्रगणकास द्यावी लागणार आहे.

दर १० वर्षांनी जनगणना होणे अपेक्षित असते. शेवटची जनगणना २०११ मध्ये झाली होती, ज्यानुसार जालना जिल्ह्याची लोकसंख्या १९ लाख ५८ हजार ४८३ इतकी नोंदवण्यात आली होती. यात १० लाख १५ हजार पुरुष व ९ लाख ४३ हजार ३६९ महिलांचा समावेश होता. २०२१ मध्ये होणारी जनगणना आता २०२६ मध्ये होत आहे. या प्रक्रियेसाठी प्रशासनाने जुने प्रगणकगट रद्द केले आहेत. आता साधारणतः १४० ते १६० घरांचा म्हणजेच ४०० ते ७०० लोकसंख्येचा एक नवीन प्रगणकगट तयार केला जाणार आहे. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषदेसह पालिकेतील अधिकाऱ्यांना मास्टर ट्रेनर्स म्हणून नियुक्त करण्यात येणार आहे. प्रशासनाकडून जनगणनेची तयारी सुरू असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी दिली.

कामे ‘ऑनलाइन’ पद्धतीनेयंदाच्या जनगणनेचे वैशिष्ट्य म्हणजे ती पूर्णपणे हायटेक असणार आहे. प्रगणकांसाठी विशेष ‘टॅब’ आणि नागरिकांसाठी स्वतंत्र ‘ॲप’ उपलब्ध करून दिले जाईल. नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जनगणनेचे पहिले प्रशिक्षण पार पडले. जनगणना संचालनालयाचे अधिकारी प्रवीण भगत व अरुण साळेगावकर यांनी संगणकीय सादरीकरण व प्रश्नोत्तराच्या माध्यमातून सुलभ पद्धतीने प्रशिक्षण दिले. यावेळी घनसावंगीचे तहसीलदार रमेश पागोटे यांच्यासह महानगरपालिका अधिकारी, सर्व तहसीलदार, नगरपरिषद मुख्याधिकारी, नायब तहसीलदार, सहायक महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, नगर रचनाकार व जनगणना लिपिक आदी अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते.

प्रगणक ३३ प्रश्न विचारणार१ एप्रिलपासून जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील जनगणनेचे काम सुरू होईल. यावेळी प्रगणक घरी येऊन माहिती गोळा करणार आहेत. प्रगणक ३३ प्रश्न विचारणार असून, घराची स्थिती, कुटुंबाची माहिती, मूलभूत सुविधा, मालमत्ता, भौतिक सुविधा यावरील प्रश्नांचा समावेश असणार आहे. ज्यांनी कुटुंबाची माहिती देण्यास टाळाटाळ केल्यास त्यांची वेगळी नोंद घेण्यात येणार आहे.

आहार सांगावा लागणारप्रगणकाकडून विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यानुसार, भौतिक सुविधांसह आहाराची माहिती द्यावी लागणार आहे. यात शाकाहारी असाल तर कोणते धान्य सेवन करता, तर मांसाहारी असाल तर तशी माहिती प्रगणकास द्यावी लागणार आहे. प्रगणक याची नोंद डिजिटल पद्धतीने घेणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Census Resumes After 15 Years; Family's Diet Information Required.

Web Summary : After 15 years, census work restarts April 1st. Jalna administration prepares for house listing. People will share diet information. The survey will be conducted digitally.
टॅग्स :Jalanaजालना