‘आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस’ साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:46 IST2021-02-23T04:46:40+5:302021-02-23T04:46:40+5:30

‘त्या’ कुटुंबाच्या मदतीसाठी धावले हात आव्हाना : भोकरदन तालुक्यातील आव्हाना येथील भाऊसाहेब ठाले यांच्या घराला आग लागून लाखो ...

Celebrating ‘International Mother Language Day’ | ‘आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस’ साजरा

‘आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस’ साजरा

‘त्या’ कुटुंबाच्या मदतीसाठी धावले हात

आव्हाना : भोकरदन तालुक्यातील आव्हाना येथील भाऊसाहेब ठाले यांच्या घराला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. यामुळे ते अडचणीत सापडले होते. अडचणीत सापडलेल्या ठाले कुटुंबीयांच्या मदतीसाठी ग्रामपंचायत सदस्य गीता गावंडे या धावल्या. त्यांनी ठाले कुटुंबाला रोख रक्कम, धान्य, कपडे यांसह जीवनाश्यक वस्तू दिल्या आहेत. यावेळी ग्रामस्थांची उपस्थिती होती.

जालन्याचे राजू काणे यांची क्रिकेट संघटनेच्या समितीवर निवड

जालना : जालना येथील साई काणे क्रिकेट अकॅडमीचे प्रशिक्षक व मार्गदर्शक राजू तुकाराम काणे यांची पुन्हा महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या ज्युनिअर कमिटीवर निवड झाली आहे. याआधी २००७ ते २०२१ दरम्यान काणे यांनी १३, १४, १५, १६ व १९ वर्षांखाली महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवड समितीचे अध्यक्ष भूषवले होते. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘जेल भरो’ आंदोलन स्थागित

जालना : शिवसेना दलित आघाडीच्या वतीने जालना जिल्ह्यातील दलित आदिवासी भूमिहीन गायरान कास्तपटे नावे करून सातबारा मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २२ फेब्रुवारी रोजी जेल भरो आंदोलन केले जाणार होते. परंतु, कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे ते स्थागित करण्यात आले आहे, अशी माहिती शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्कर मगरे यांनी दिली.

ग्रामस्थांच्या वतीने रशीद मोमीन यांचा सत्कार

जामखेड : जालना राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा सचिवपदी रशिद मोमीन यांची निवड झाल्याबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तुकाराम जाधव, रशीद मोमीन, अ‍ॅड. मनोज तार्डे, अ‍ॅड. रतन तार्डे, उपसरपंच फैसल कुरैशी, ग्रामपंचायत सदस्य गंगाधर पांढरे, तुळशीराम वैद्य, जुनेद तांबोळी, भाऊसाहेब भोजने, रशीद तांबोळी, तुळशीराम मंडलिक, अशोक पांजगे, इरफान मोमीन, मुदस्सर तांबोळी, जुनेद मोमीन, दिलावर भाई, नारायण सांगुळे, विनोद चव्हाण, आदींची उपस्थिती होती.

देवगिरी हायस्कूमध्ये शिवजयंती साजरी

जालना : येथील वीर शिवाजी बचतगट व देवगिरी विद्या प्रतिष्ठान संचलित देवगिरी इंग्लिश हायस्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अ‍ॅड. दशरथ शिराळे, प्राचार्य गायत्री सोरटी, संस्थेचे अध्यक्ष बबन सोरटी, प्रा. हरिचंद्र सिरसाट, खिल्लारे, सपना बचत गटाचे सचिव दत्ता जाधव, विनोद शिरसाट, राहुल वाकेकर, रावसाहेब भद्रे, मनोज मोरे, श्रीमंत वाघ, कैलास म्हस्के, योगेश साळुंके, राजू काळे, मंदा खंदारे, आदींची उपस्थिती होती.

===Photopath===

210221\21jan_68_21022021_15.jpg

===Caption===

आव्हाना येथील जि.प. शाळेत आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस साजरा करण्यात आला. 

Web Title: Celebrating ‘International Mother Language Day’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.