जालना शहरात ठिकठिकाणी दत्त जन्मोत्सव उत्साहात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 23:52 IST2017-12-03T23:51:57+5:302017-12-03T23:52:05+5:30
येथील नरिमाननगरातील श्रीक्षेत्र दिंडोरीप्रणीत श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा, विकास व बालसंस्कार केंद्रात रविवारी भक्तिमय वातावरणात दत्त जयंती साजरी करण्यात आली. दिगंबरा....दिगंबरा.... श्रीपाद वल्लभ दिगंबरा, अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त अशा जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला.

जालना शहरात ठिकठिकाणी दत्त जन्मोत्सव उत्साहात साजरा
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील नरिमाननगरातील श्रीक्षेत्र दिंडोरीप्रणीत श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा, विकास व बालसंस्कार केंद्रात रविवारी भक्तिमय वातावरणात दत्त जयंती साजरी करण्यात आली. दिगंबरा....दिगंबरा.... श्रीपाद वल्लभ दिगंबरा, अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त अशा जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला.
दत्त जयंतीनिमित्त रविवारी पहाटेपासून शहरातील केंद्रांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. ठिकठिकाणच्या केंद्रात पहाटे गुरूचरित्र पारायणाचा समारोप करण्यात आला. नित्य स्वाहाकार, दुर्गा सप्तशतीच्या चौथ्या आध्यायाचे वाचन करून बलीपूर्ण आहूती अर्पण करण्यात आली. नरीमान नगर केंद्रात नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्या हस्ते आरती करण्यात आल्यानंतर दुर्गा सप्तशतीचे महिला सेवेकºयांनी सामूहिक पाठ घेतले. स्वामी चरित्र सारामृताचेही वाचन करण्यात आले. दुपारी पुष्पा तनपुरे यांनी गुरूचरित्राच्या चौथ्या अध्यायातील दत्त जन्माचे निरूपण केले. या वेळी काकासाहेब भडांगे यांनी दत्त अवताराचे महत्व विषद केले. महिला सेवेकºयांनी विविध भजने, भारूडे सादर केली. यामुळे वातावरण भक्तीमय झाले होते. रूख्मिणी पाटील यांनी वासुदेवाचा हुबेहुब देखावा सादर केला. केंद्राच्या वतीने भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी कुलभुषण जैस्वाल, बबनराव गाडेकर, नानाभाऊ उगले, राम सावंत, संजय चौधरी, चंद्रकांत दरबस्तरवार, भाऊसाहेब घुगे, जगन घोडे, कल्याण सोळंके, लक्ष्मण तारो, डॉ. मानधना, आशा उगले यांच्यासह महिला पुरूष व सेवेकºयांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. दत्त जयंतीनिमित्त येथे सुरु असलेल्या अखंड नामजप यज्ञ सप्ताहाची सोमवारी सांगता होणार आहे.