जिल्ह्यात नाताळ उत्साहात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 01:01 IST2017-12-26T00:59:40+5:302017-12-26T01:01:08+5:30
जालना शहरासह जिल्ह्यातील विविध चर्चमध्ये सोमवारी ख्रिश्चनबांधवांच्या वतीने नाताळचा सण उत्साहात साजरा करण्यात आला.

जिल्ह्यात नाताळ उत्साहात साजरा
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना शहरासह जिल्ह्यातील विविध चर्चमध्ये सोमवारी ख्रिश्चनबांधवांच्या वतीने नाताळचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध चर्चमध्ये विशेष प्रार्थना संभांचे आयोजन करण्यात आले होते.
शहरातील शंभर वर्ष जुन्या असलेल्या क्राईस्ट चर्च कॅथड्रल (सीएनआयचर्च) मध्ये सकाळी ख्रिश्चन बांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. नवीन कपडे परिधान करून आलेल्या बच्चे कंपनीमध्ये विशेष उत्साह दिसून आला. शहरातील सेंट मेरी कॅथालिक चर्च, सेव्हंथ डे अडव्हेंटिस्टचर्च, तसेच जुना जालना भागातील विविध चर्चमध्ये नाताळ निमित्त येशू ख्रिस्तांची सामुहिक प्रार्थना करण्यात आली. विविध शाळांमध्ये यानिमित्ताने विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम घेण्यात आले. बाजारातही खरेदीसाठी गर्दी दिसून आली.