विविध उपक्रमांनी शिवजन्मोत्सव साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:57 IST2021-02-21T04:57:55+5:302021-02-21T04:57:55+5:30
खांबेवाडी येथे अभिवादन जालना : खांबेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जिजाबाई राठोड, वंदना शिंदे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून ...

विविध उपक्रमांनी शिवजन्मोत्सव साजरा
खांबेवाडी येथे अभिवादन
जालना : खांबेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जिजाबाई राठोड, वंदना शिंदे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी गजानन मगर, अच्युत वाघ, सहशिक्षिका एस.बी.गोगे, अंगणवाडी कार्यकर्ती शोभा राठोड यांच्यासह शिक्षक, पालकांची उपस्थिती होती.
साळेगाव घारे येथे कार्यक्रम
जालना : साळेगाव घारे येथे आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सतीश घारे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मराठा मावळा जिल्हाध्यक्ष सतीश घारे, माजी सरपंच त्र्यंबकराव घारे, काशिनाथराव घारे, शाम घारे, प्रदीप घारे, संदीप घारे, रत्नकला घारे, अश्विनी घारे, सोनाली घारे, सताक्षी घारे, सखाराम नाईकनवरे आदींची उपस्थिती होती.
हस्ते पिंपळगाव शाळा
जालना : हस्ते पिंपळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष कैलास मगर, सरपंच अर्जुन सातपुते यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रभारी मुख्याध्यापक संजय आधे, प्रभाकर काळे, भगवान शिंगाडे, उपसरपंच नारायण मगर, शिक्षिका रिता जवादे, मनीषा हंडे, ऋषिकेश कावळे, केदार कुलकर्णी, सुभाष साबळे, मदन सातपुते, सुनील सातपुते, शेख अकबर, राजू साबळे आदींची उपस्थिती होती.
स्काउट गाइड जिल्हा कार्यालय
जालना : येथील स्काउट गाइड आणि गाइड जिल्हा कार्यालयात संस्थेचे अध्यक्ष भीमराव डोंगरे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा प्रशिक्षण आयुक्त स्काउट व्ही.बी. गायकवाड, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त गाइड अख्तर जहाँ कुरेशी, जिल्हा संघटक स्काउट के. एल.पवार, रमेश भागवत, कब मास्टर गजानन गिरे, वेंकटेश शेळके, कर्मचारी संदीप घुसिंगे, अविनाश वाकोडे आदींची उपस्थिती होती.
राज्य शिक्षक सेना
जालना : महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा सचिव संतोष डोंगरखोस, तालुकाध्यक्ष संजय आधे, मंठा तालुकाध्यक्ष विनायक राठोड, जिल्हा पदाधिकारी प्रभाकर काळे, भगवान शिंगाडे, मर्दानसिंग बेडवाल, यशवंत मोरे, गणपत शेेळके आदींची उपस्थिती होती.
श्रीकृष्णनगरमध्ये कार्यक्रम
जालना : शहरातील श्रीकृष्णनगरमध्ये विविध उपक्रमांनी शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी बळीराम लोखंडे, प्रेम पेशवानी पेशवे यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास तुषार क्षीरसागर, योगेश कुबेर, बबलू छडीदार, पवन छडीदार, अजय घुले, राम जोशी, विजय भांदुर्गे, सर्जेराव क्षीरसागर, मयुरेश वैष्णव, गणेश दहेकर आदींची उपस्थिती होती.
जिल्हा मध्यवर्ती बँकेत अभिवादन
जालना : येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष देशमुख, व्यवस्थापक प्रमोद देशमुख, विभाग प्रमुख विश्वनाथ जाधव यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भागवत भांदरगे, सदाशिव कोल्हे, सुरेश केसापुरे, सुनील देशमुख, सुभाष गोडबोले, प्रकाश धांडे, श्याम पवार, अंगद येवले, संजय आंबेकर, सचिन तौर, विजय लुंगे, विकास नवले, अंकुश नवले, संदीप राठोड, राजू बोचरे, राधेश्याम ठाकरे आदींची उपस्थिती होती.
पारधमध्ये रक्तदान शिबिर
पारध : भोकरदन तालुक्यातील पारध (बु.) येथे शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नवभारत तरुण मित्रमंडळाच्या युवकांसह ग्रामस्थांनी रक्तदान केले. कार्यक्रमास पदाधिकारी, ग्रामस्थांची उपस्थिती होती.