जालन्यात महेश नवमी उत्साहात साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 00:10 IST2019-06-12T00:09:16+5:302019-06-12T00:10:10+5:30
जालना शहर आणि जिल्ह्यामध्ये महेश नवमी मंगळवारी विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.

जालन्यात महेश नवमी उत्साहात साजरी
जालना : जालना शहर आणि जिल्ह्यामध्ये महेश नवमी मंगळवारी विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. या अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात असलेल्या जय महेश चौकामध्ये सकाळी पुजा करण्यात आली. तर बडीसडक, शिवाजी पुतळा, काद्राबाद आदी भागातून भगवान शंकराच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली.
या मिरवणुकीसह माहेश्वरी समाजाने विविध उपक्रम हाती घेतले होते. त्यात गरीबांना अन्नदान, रक्तदान शिबीर यासह समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला.