होळी, धूलिवंदन साधेपणाने साजरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:30 IST2021-03-31T04:30:32+5:302021-03-31T04:30:32+5:30
होळीला जालन्यात मोठ्या प्रमाणावर भजन, गीत सादर करून होळीची सामूहिक पूजा करण्याची पद्धत रूढ आहे. परंतु यंदा गर्दी न ...

होळी, धूलिवंदन साधेपणाने साजरे
होळीला जालन्यात मोठ्या प्रमाणावर भजन, गीत सादर करून होळीची सामूहिक पूजा करण्याची पद्धत रूढ आहे. परंतु यंदा गर्दी न करण्याचे आदेश असल्याने तसेच जमावबंदीचे उल्लंघन होईल या भीतीने नागरिकांनी देखील संयम पाळून होळी साध्या पद्धतीने साजरी केली.
धूलिवंदनाच्या दिवशी यंदा तापमानाचा पाराही ३७ अंशांपेक्षा अधिकवर गेला होता. त्यामुळे अनेकांनी घरात राहणेच पंसद केले. त्यामुळे धूलिवंदनाला रंगानी न्हाऊन निघणारे रस्ते सामसूम होते. केवळ तुरळक नागरिक काही कामानिमित्त बाहेर पडत होते. त्यांनाही तैनात असलेले पोलीस कर्मचारी अडवून मास्क घालण्यासह कुठे चाललात याची विचारपूस करत होते.
चौकट
बच्चे कंपनी बिनधास्त...
कोरोनामुळे मोठ्यांच्या होळीवर परिणाम झाला आहे. हे जरी खरे असले तरी बच्चे कंपनी म्हणजेच साधारणपणे १० ते १४ वयोगाटतील मुला-मुलींनी पिचकाऱ्यांत रंग भरून एकमेकांना रंगविल्याचे दिसून आले. अनेक भागात या मुलांनी कल्ला करून आपला होळीचा आनंद साजरा केला. परंतु, त्यालाही मर्यादा असल्याचे दिसून आले.