नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करा -जायभाये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:30 IST2021-09-11T04:30:12+5:302021-09-11T04:30:12+5:30

माहोरा : सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे गणेश मंडळांनी नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता द्यावी. एक गाव ...

Celebrate Ganeshotsav by following the rules - Jayabhaye | नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करा -जायभाये

नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करा -जायभाये

माहोरा : सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे गणेश मंडळांनी नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता द्यावी. एक गाव एक गणपती उत्सव संकल्पना माहोराकरांची अतिशय उत्कृष्ट असून, माहोरा गाव आदर्श म्हणून घोषित झाले आहे, असे प्रतिपादन पोनि. रमेश जायभाये यांनी केले. माहोरा येथील ग्रामसंसद कार्यालयात शांतता समितीची बैठक गुरुवारी घेण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते.

पुढे बोलताना जायभाये म्हणाले की, माहोरासारख्या गावात एक गाव एक गणपती हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याचा तालुक्यातील इतर गावांनी आदर्श घ्यावा. कोरोनामुळे गणेशोत्सवाच्या मिरवणुकीला परवानगी नाही. त्यामुळे कोणीही डीजे लावून मिरवणूक काढू नये, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या सर्व नियमांचे पालन करावे, जे लोक नियमांचे उल्लंघन करतील, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असेही जायभाये म्हणाले. याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख सुरेशकुमार बोरसे, डॉ. रवींद्र कासोद, उपसरपंच गजानन साळोक, सचिन तिडके, तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब गव्हले, समाजसेवक दादाराव गडकरी, ग्रा.पं. सदस्य सुखदेव साबळे, संदीप साळवे, लक्ष्मण वाघ, विकास जाधव, प्रकाश सोनवणे, योगेश साळवे, गणेश गायकवाड, सोईल पठाण, विजू इंगळे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Celebrate Ganeshotsav by following the rules - Jayabhaye

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.