सीसीआयचे सुरांजे यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:25 IST2021-01-02T04:25:57+5:302021-01-02T04:25:57+5:30
परतूर : तालुक्यातील पाच सीसीआयच्या खरेदी केंद्रावर आजवर विना तक्रार एक लाख क्विंटल कापसाची खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात ...

सीसीआयचे सुरांजे यांचा सत्कार
परतूर : तालुक्यातील पाच सीसीआयच्या खरेदी केंद्रावर आजवर विना तक्रार एक लाख क्विंटल कापसाची खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आला आहे. याबद्दल सीसीआयचे केंद्र प्रमुख प्रीतेश सुरांजे यांचा बाजार समितीच्यावतीने सभापती कपील आकात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावर्षी सीसीआयची कापूस खरेदी शिस्तीत सुरू असून, एक लाख क्विंटल कापसाची खरेदी आजवर तालुक्यात करण्यात आली आहे. या कार्यक्रमास सचिव रामकिसन लिपणे, दिलीप नाहर, अक्षय नाहर, जि.प. सदस्य शिवाजी सवने, अशोक तरासे, धुमाळ आदींची उपस्थिती होती.
फोटो ओळ : एक लाख क्विंटल कापसाची विना तक्रार खरेदी केल्याबद्दल सीसीआयचे प्रीतेश सुरांजे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सभापती कपील आकात, सचिव आर. बी. लिपणे, शिवाजी सवने, दिलीप नाहर आदी.