कासारवाडीत दारू पकडली-२
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:41 IST2021-02-27T04:41:13+5:302021-02-27T04:41:13+5:30
रस्त्याची दुरवस्था जालना : तालुक्यातील सोमनाथ गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे रस्त्याची दुरवस्था झाली ...

कासारवाडीत दारू पकडली-२
रस्त्याची दुरवस्था
जालना : तालुक्यातील सोमनाथ गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. याबाबत अनेकवेळा जि.प.ला निवेदने देण्यात आली. परंतु, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. याकडे लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
अध्यक्षपदी परमेश्वर अंभोरे यांची नियुक्ती
बदनापूर : तालुक्यातील सेलगाव येथील व्यापारी संघाच्या अध्यक्षपदी परमेश्वर अंभोरे व सचिवपदी गोविंद चेचाणी यांची बुधवारी फेरनिवड झाली आहे. जिल्हाध्यक्ष हस्तीमल बंब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. या बैठकीला संघटनेचे जिल्हा सहसचिव जगन्नाथ थोटे, अतुल लड्डा, सुरेशकुमार तापडिया, अशोककुमार संचेती, गजानन गिते, बदनापूरचे राजेश जर्हाड आदींची उपस्थिती होती.
गोंदी येथे वृद्ध महिलेस मारहाण
गोंदी : अंबड तालुक्यातील गोंदी येथील अनुसयानगर येथे बुधवारी दारूच्या नशेतील एका व्यक्तीने घरात शिरून एका वृध्द महिलेस बेदम मारहाण केली. यामुळे महिला जखमी झाली आहे. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी मनोहर घडसिंग व एक महिला यांच्याविरुद्ध गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस करीत आहे.
सूचना फलकांअभावी चालकांची गैरसोय
जालना : जालना- मंठा महामार्गावरील अपघातात वाढ झाली आहे. धोकादायक ठिकाणी सूचना फलक, दिशादर्शक फलक नसल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे. शिवाय वाहन चालक, प्रवाशांचीही गैरसोय होत आहे. वाढलेले रस्ता अपघात पाहता बांधकाम विभागाने लक्ष देऊन या महामार्गावर गरजेनुसार सूचना फलक, दिशादर्शक फलक लावावेत, अशी मागणी होत आहे.
तुटलेल्या वीज तारा जोडण्याची मागणी
अंबड : तालुक्यातील हनुमाननगर परिसरातील शिंदेवस्ती भागात गेल्या चार महिन्यांपूर्वी खांब पडले, तसेच वीज तारा तुटल्या होत्या. तेव्हापासून या भागातील वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थ तसेच शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. या भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी बाबासाहेब शिंदे, आसाराम शिंदे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी केली.