धाकलगाव येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:29 IST2020-12-29T04:29:38+5:302020-12-29T04:29:38+5:30
वडीगोद्री : आरोग्यमंत्री राजेश टोपे व एच.व्ही. देसाई हॉस्पिटल, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महानवदृष्टी अभियानाअंतर्गत अंबड तालुक्यातील धाकलगाव येथे ...

धाकलगाव येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर
वडीगोद्री : आरोग्यमंत्री राजेश टोपे व एच.व्ही. देसाई हॉस्पिटल, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महानवदृष्टी अभियानाअंतर्गत अंबड तालुक्यातील धाकलगाव येथे रविवारी मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात ३३० रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १३७ जणांची शस्त्रक्रियेसाठी निवड झाली. या सर्व रूग्णांवर पुणे येथे शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या प्रसंगी एच.व्ही.देसाई हॉस्पिटलचे डॉ. रणजित कदम, डॉ. अजित यादव, डॉ. भाकरे, इलियास पठाण, राजाभाऊ नाझरकर, मुसाभाई पठाण, शिवाजी नाझरकर, सखाराम शेंडगे, बद्रीनाथ शेंडगे, राम घिगे, मनोज शिर्के, शिवाजी नाझरकर, दशरथ नावडे, विलास उंडे, मुस्तक शेख आदींची उपस्थिती होती.
शिबीर यशस्वीतेसाठी वडीगोद्री प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशील जावळे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. ए.डी. बडे, डॉ. एस.ए. भांगे, डॉ. एस.के. सानप, डॉ. प्राजक्ता मोरे, आरोग्यसेवक बिबे, सी.के. वाहूळ, योगेश बळी, अर्शद शेख, कैलास वराडे, टी.सी. आहिरे, यु.ए. साने, सी.के. वाहुल, एच.एस. शेख, एम.एल. ढाकणे, एस.पी. कालापहाड, गटप्रवर्तक उज्वला दखणे, आशा सेविका स्वाती कोळपकर, चेतना बिबे, सविता गिरी, वर्षा आगलावे, दया खेडकर आदींनी परीश्रम घेतले.