ट्रेलर चालकाविरुद्ध बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:00 IST2021-02-05T08:00:05+5:302021-02-05T08:00:05+5:30
तीर्थपुरी येथे रोहन काळे यांचा सत्कार तीर्थपुरी : मुंबई येथील रोहन काळे हा महाराष्ट्र बारव मोहीम अंर्तगत राज्यातील बारवांना ...

ट्रेलर चालकाविरुद्ध बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
तीर्थपुरी येथे रोहन काळे यांचा सत्कार
तीर्थपुरी : मुंबई येथील रोहन काळे हा महाराष्ट्र बारव मोहीम अंर्तगत राज्यातील बारवांना भेटी देत आहेत. शनिवारी रोहन काळे हा आपल्या दुचाकीने तीर्थपुरी येथे दाखल झाला. यावेळी त्याने बारवची पाहणी केली. त्याचा सरपंच शैलेंद्र पवार यांनी सत्कार केला. यावेळी सतीष केसकर, अण्णा चिमणे, परमेश्वर कडुकर आदींची उपस्थिती होती.
अवैध वाळू साठा जप्त
तळणी : मंठा तालुक्यातील उस्वद येथील पूर्णा नदीपात्रातून अंदाजे २०० ब्रास अवैध वाळू जप्त करण्यात केली. तर गावात ठिकठिकाणी ४७ ब्रास अवैध वाळू साठा जप्त करण्यात आला. ही कारवाई उस्वदचे तलाठी नितीन चिचोले यांनी शनिवारी दुपारी केली.
उपशिक्षणाधिकाऱ्यांची शाळेला भेट
जालना : उपशिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात यांनी नुकतीच वरखेडा सिंदखेड येथील जि. प. शाळेस भेट दिली. यावेळी केंद्रप्रमुख विष्णू तिडके, अशोक गायकवाड यांची उपस्थिती होती. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या सर्व नियमांचे पालन केली नाही, याची पाहणी त्यांनी केली. याप्रसंगी मुख्याध्यापक श्यामकुमार खांडेभराड, आदर्श शिक्षक बबन जाधव, विष्णू मुंढे, रामेश्वर घनघाव, अर्जुन मुंढे, स्नेहलता निर्मळ आदींची उपस्थिती होती.
दहीपुरी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण
अंबड : दहीपुरी येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर विद्यालयात संस्थेचे सचिव अमोल खरात यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी तलाठी मगरे, साहेबराव मोरे, एस. यू. मोरे, प्रेमदास राठोड, गौतम लिहिणार, अतिश निर्मळ, कैलास गायके, जालिंदर रांजणे यांच्यासह पालक बळीराम तोगे, जितेंद्र सपकाळ, रावसाहेब टापरे, अंबादास जोशी, विपुल निर्मळ, गुलाब शेख, उत्तम येडे, अनंता जायभाये, परमेश्वर उगले, दिनेश ठाकूर, कृष्णा गायके, सचिन अंबडकर, बाळासाहेब ढेंबरे आदींची उपस्थिती होती.