सूचनाफलक गायब
जालना : जालना ते देऊळगाव राजा रस्त्यावरील सूचना फलक, दिशादर्शक फलक गायब झाले आहेत. त्यामुळे चालकांची गैरसोय होत असून, अपघातप्रवण क्षेत्रात अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे गरजेनुसार सूचना फलक बसविण्याची मागणी होत आहे.
गुटखा विक्री जोमात
जाफराबाद : शहरासह ग्रामीण भागात अवैध गुटखा विक्री वाहतूक जोमात सुरू आहे. शासनाने गुटखा विक्री, वाहतुकीला बंदी घातली आहे. परंतु, हे बंदी आदेश तस्करांकडून धाब्यावर बसविले जात असून, याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
बागायतदारांचे नुकसान
अंबड : गत दोन दिवसांपूर्वी तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट व पाऊस झाला. या पावसात या भागातील फळबागांना मोठा फटका बसला. झालेल्या नुकसानीचे प्रशासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
रस्त्यांची दुरवस्था
परतूर : शहरांतर्गत भागातील विविध रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. खराब रस्त्यामुळे चालकांना कसरत करीत वाहने चालवावी लागत असून, अपघाताचा धोकाही वाढला आहे. ही बाब पाहता संबंधितांनी रस्ते दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.