स्वच्छता मोहीम राबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:20 IST2021-06-10T04:20:58+5:302021-06-10T04:20:58+5:30
रुग्णसंख्येत वाढ बदनापूर : गत काही दिवसापासून वातावरणात सतत बदल होत आहे. वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला, तापासह इतर आजारांचे ...

स्वच्छता मोहीम राबवा
रुग्णसंख्येत वाढ
बदनापूर : गत काही दिवसापासून वातावरणात सतत बदल होत आहे. वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला, तापासह इतर आजारांचे रुग्ण वाढत आहेत. परंतु, अनेक रुग्ण कोरोनामुळे आजार अंगावर काढत असल्याचे चित्र या भागामध्ये दिसून येत आहे.
वीजपुरवठा विस्कळीत
देळेगव्हाण : जाफराबाद तालुक्यातील देळेगव्हाणसह परिसरातील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. खंडित वीजपुरवठ्यामुळे ग्राहकांना नाहक गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन सुरळीत वीजपुरवठा करण्याची मागणी होत आहे.
गुटखाविक्री जोमात
बदनापूर : शहरासह ग्रामीण भागात अवैधरीत्या गुटखा विक्री केली जात आहे. शासनाने गुटखा विक्रीवर बंदी घातली आहे. परंतु, संबंधित प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गुटख्याचा गोरख धंदा सुरू आहे. याकडे लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
धोकादायक डीपीकडे दुर्लक्ष
भोकरदन : शहरांतर्गत विविध भागातील मुख्य रस्त्यावर महावितरणच्या डीपी सताड उघड्या राहत आहेत. उघड्या डीपीमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. परंतु, संबंधित अधिकाऱ्यांचे डीपी कुलूप बंद ठेवण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.