शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
2
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
3
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
4
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
5
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
6
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
7
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
8
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
9
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
11
लाईव्ह कॉन्सर्टमध्येच नखं कापायला लागला अरिजीत सिंग, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Video व्हायरल
12
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
13
तिरुपती बालाजी मंदिरात लग्न करणार जान्हवी कपूर? दोनच शब्दात कमेंट करत म्हणाली...
14
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
15
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
16
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
17
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
18
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
19
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
20
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव

नळणीवाडी शिवारात १० लाख रुपयांचे गांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2021 7:19 PM

पोलिसांच्या छाप्या पूर्वी काही गांजा जाळून टाकला असल्याचे निदर्शनास आले आहे.

भोकरदन : तालुक्यातील नळणी वाडी शिवारात भोकरदन पोलिसांनी छापा टाकून सुमारे 10 लाख रुपयांचा गांजा जप्त केला आहे.

नळणी शिवारातील भावसिंग मारग यांनी शेतात गांजाची लागवड केल्याची गुप्त माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी इंदलसिंग बहुरे यांना मिळाली. त्यावरून 4 डिसेंबर रोजी 4 ते 5 वाजेच्या दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी इंदलसिंग बहुरे, सपोनि रत्नदीप जोगदंड, हसनाबादचे सपोनि संतोष घोडके, पोलिस उपनिरीक्षक सचिन कापुरे, पोलिस उपनिरीक्षक पाडळे, सानप, पोलिस कर्मचारी गणेश पायघन, जोशी, सतिष जाधव, एकनाथ वाघ, बनसोडे यांच्या पथकाने भावसिंग मारगच्या शेतात छापा टाकला. यावेळी वाळलेला 50 ते 60 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. 

तसेच छाप्या पूर्वी काही गांजा जाळून टाकला असल्याचे निदर्शनास आले आहे. या गांजाची किंमत सुमारे 8 ते 10 लाख रुपये असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. अद्याप पंचनामा करण्याचे काम सुरू असून अद्याप गुन्हा दाखल झाला नव्हता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना