दोन लाखांचा गांजा पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 01:12 AM2018-06-01T01:12:48+5:302018-06-01T01:12:48+5:30

बड तालुक्यातील महाकाळा येथे एका इसमाकडून दोन लाख रूपयांचा वीस किलो गांजा शुक्रवारी रात्री पोलिसांनी पकडला. बाळू साहेबराव माहिते (रा. मूर्तिजापूर, जि. अकोला) असे त्या इसमाचे नाव आहे.

Cannabis of 2 lakhs seized | दोन लाखांचा गांजा पकडला

दोन लाखांचा गांजा पकडला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : अंबड तालुक्यातील महाकाळा येथे एका इसमाकडून दोन लाख रूपयांचा वीस किलो गांजा शुक्रवारी रात्री पोलिसांनी पकडला. बाळू साहेबराव माहिते (रा. मूर्तिजापूर, जि. अकोला) असे त्या इसमाचे नाव आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली.
महाकाळा येथे एक इसम गांजा विक्रीसाठी घेऊन येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेंद्रसिह गौर यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी लगेचच शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या दरम्यान महाकाळा परिसरात सापळा लावला असता, त्यांना बाळू मोहिते हा एका गोणित २० किलो गांजा घेऊन येत असल्याचे आढळून आले. त्यांनी तातडीने त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील गांजा जप्त केला. या प्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा गांजा त्याने कोणाकडून आणि कोणाला विक्रीसाठी आणला होता, याचा शोध आता पोलीस घेणार असल्याचे सांगण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ही कारवाई पोलीस निरीक्षक राजेंद्रसिह गौर, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वारे, पोहेकॉ. कैलास कुरेवाड, सॅम्युअल कांबळे, संजय मगरे, प्रशांत देशमुख, रामेश्र्वर बघाटे, रंजित वैराळ, गणेश वाघ, मंदा बनसोडे, शमशाद पठाण यांनी यशस्वी केली.

Web Title: Cannabis of 2 lakhs seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.