बाहेरच्या मतदारांसाठी उमेदवारांचा आटापिटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:23 IST2021-01-10T04:23:06+5:302021-01-10T04:23:06+5:30
अशा वेळी कामाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने बाहेरगावी असणाऱ्या मतदारांना मतदानासाठी बोलाविण्याचे नियोजन सध्या उमेदवारांकडून सुरू असल्याचे दिसून येत आहे. ...

बाहेरच्या मतदारांसाठी उमेदवारांचा आटापिटा
अशा वेळी कामाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने बाहेरगावी असणाऱ्या मतदारांना मतदानासाठी बोलाविण्याचे नियोजन सध्या उमेदवारांकडून सुरू असल्याचे दिसून येत आहे. आजपासून काही महिन्यांपूर्वी कोरोनाच्या काळात शहरातील अनेकजण आपल्या गावाकडे परतले होते. अशा वेळी काही गावांनी या आपल्या बांधवांचे गावी स्वागत केले; तर काही गावांनी गावात येणाऱ्या रस्त्यांंवर काठ्या लावून त्यांना ‘नो एंट्री’ म्हणून बजावले होते. तेव्हा पाय ठेवू दिला नाही. आता मात्र मोठ्या आस्थेने याच मतदारांची विचारपूस केली जात आहे. ‘काहीही करा; पण आमच्यासाठी एक दिवस द्या,’ अशा विनवण्या गावागावांतून केल्या जात आहेत. ‘तेव्हा काटे अंथरले, आता कशाला पायघड्या घालता’ असे म्हणून अनेकजण हिशेब चुकता करीत आहेत. असे असले तरी कोरोनाकाळात ज्या ग्रामस्थांनी सहारा दिला, क्वारंटाईन सेंटरवर भाकरी पुरविल्या, अशांसाठी मतदार ही तुमच्यासाठी काहीपण म्हणत मतदानाला येण्याचे ठाम आश्वासन देत आहेत. सध्या ग्रामपंचायतीची निवडणूक होत असलेल्या अनेक गावांत बाहेरगावचे मतदान आणण्यासाठी उमेदवारांचा चाललेला आटापिटा गावात चर्चेचा विषय बनला आहे, हे मात्र तितकेच खरे.