बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून जालन्यातील युवकांच्या स्टार्ट-अपला साद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:21 IST2021-01-13T05:21:11+5:302021-01-13T05:21:11+5:30

चौकट जिद्द, सहकार्यामुळेच यश जालन्यासारख्या ठिकाणी राहूनही जगाच्या नकाशावर पोहचता येते, हे येथील महिको, स्टील उद्योगांसह ६० पेक्षा अधिक ...

Call for start-ups of youth in Jalna from multinational companies | बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून जालन्यातील युवकांच्या स्टार्ट-अपला साद

बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून जालन्यातील युवकांच्या स्टार्ट-अपला साद

चौकट

जिद्द, सहकार्यामुळेच यश

जालन्यासारख्या ठिकाणी राहूनही जगाच्या नकाशावर पोहचता येते, हे येथील महिको, स्टील उद्योगांसह ६० पेक्षा अधिक देशांमध्ये प्लास्टिकच्या टाक्या बनविणारे मशीन तयार करणारे उद्योजक सुनील रायठठ्ठा यांनी दाखवून दिले आहे. त्यांच्याकडून प्रेरणा घेत आपणही जालन्याचे म्हणजेच आपल्या जन्मभूमीचे ऋण फेडण्यासाठीच आपण येथे आपले दोन्ही अत्याधुनिक प्लांट उभारले आहेत. यातून कुशल कामगारांच्या सहकार्यातूनच आमची ही झेप यशस्वी होऊ शकली.

जितेंद्र राठी, व्यवस्थापकीय संचालक, ॲप्रोकूल इंजिनिअर्स

चौकट

१२०० अंश ते १० अंशाचा योगायोग

जालन्यातील स्टील उद्योगात लोखंड वितळविण्यासाठी लागणाऱ्या भट्टीचे तापमान हे थेट १२०० अंशापेक्षा जास्त असते. त्याच जालन्यात आता एअर कंडिशनिंगसाठीचे उत्पादन होत असून, भविष्यात जालन्यातच पूर्ण एसीचे मशीन तयार झाल्यास वावगे वाटू नये. त्यामुळे एकाच गावात आणि जवळपास एकाच एमआयडीसीत उच्च तापमान आणि दुसरीकडे एसीच्या माध्यमातून अत्यंत कमी तापमानाचे उत्पादन होत असल्याने हा एकप्रकारचा योगायोगच म्हणावा लागेल.

Web Title: Call for start-ups of youth in Jalna from multinational companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.