बिबट्याने पाडला वासराचा फडशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 23:59 IST2018-01-17T23:59:22+5:302018-01-17T23:59:28+5:30
अंबड तालुक्यातील एकलहरा शिवारात बिबट्या एका वासरावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील शेतक-यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

बिबट्याने पाडला वासराचा फडशा
तीर्थपुरी : अंबड तालुक्यातील एकलहरा शिवारात बिबट्या एका वासरावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील शेतक-यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
एकलहरा येथील ३३ केव्ही शेजारी पश्चिमेकडून असलेल्या अण्णासाहेब भीमराव चव्हाण यांचा जनावरांचा गोठा आहे. या ठिकाणी चार जनावरे बांधलेली होती. त्यातील एका वासरावर बिबट्याने मंगळवारी मध्यरात्री हल्ला चढवून त्यास ठार केले. बुधवारी सकाळी ६ वाजता योगेश चव्हाण शेतात गेले असता, ही घटना निदर्शनास आली. बिबट्याचे ठसे जमिनीवर दिसून आल्याचे ते म्हणाले. या परिसरात सध्या ऊसतोडीचे काम सुरु आहे. ऊसतोडीसाठी जाणा-या कामगारांना बिबट्या दिसला. दरम्यान, या परिसरात राहणारे गोपीनाथ कसाब यांनी सांगितले की, बुधवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या दरम्यान विठ्ठल जगताप यांच्या उसात जाणारा बिबट्या आढळून आला. शेतात माणसांचा वावर असल्यास तो उसातच राहतो. त्यामुळे बुधवारी रात्री या भागात पहारा देण्यात येणार आहे.
वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी येऊन पंचनामा करुन गेल्याचे सांगण्यात आले.