बसच्या वाहक, चालकांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:28 IST2021-02-12T04:28:07+5:302021-02-12T04:28:07+5:30
अवैध प्रवासी वाहतूक ; कारवाईकडे होतेय दुर्लक्ष जालना : शहरासह ग्रामीण भागात अनेक वाहन चालक क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक ...

बसच्या वाहक, चालकांचा सत्कार
अवैध प्रवासी वाहतूक ; कारवाईकडे होतेय दुर्लक्ष
जालना : शहरासह ग्रामीण भागात अनेक वाहन चालक क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करीत आहेत. तालुक्यातील रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. त्यात अनेक वाहन चालक नियम मोडून वाहने चालवित आहेत. त्यामुळे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
श्रीराम मंदिरासाठी निधी समर्पण कार्यक्रम
अंबड : आयोध्या येथील श्रीराम मंदिरासाठी शहरातील कै. दत्तोजी भाले विद्यालयात निधी समर्पण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र भाला, तुकाराम तौर, राजेंद्र कळकटे, राहुल व्यास, निरज दरक, मुख्याध्यापक विष्णू सोनवणे, शरद भवर यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
अवैध गुटखा विक्रेत्यांवर कारवाईची मागणी
मंठा : शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्री सुरू आहे. तळीरामांमुळे भांडण- तंट्यात वाढ होत असून, कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. युवा पिढीही व्यसनाधीन होत आहे. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देऊन अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी महिला वर्गातून केली जात आहे.
आर्थिक साक्षरता सप्ताहनिमित्त कार्यक्रम
घनसावंगी : आर्थिक साक्षरता सप्ताहनिमित्त भारतीय रिझर्व बँकेच्या वतीने तालुक्यातील रांजणी येथे जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अग्रणी बँकेचे सल्लागार कैलास तावडे यांनी मार्गदर्शन केले. कर्जवितरण, परतफेड, आर्थिक लाभ आदी बँकिंग व्यवहारांची माहिती त्यांनी दिली. यावेळी रूपेश नंदनवार, संतोष कपाळे, पंढरीनाथ भोसले यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.