वाढत्या रुग्णसंख्येमुळे जालन्यात जमावबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:56 IST2021-02-18T04:56:40+5:302021-02-18T04:56:40+5:30
जानेवारीअखेरपर्यंत जिल्ह्यात दैनंदिन सरासरी १५ हून कमी कोरोना रुग्ण आढळून येत होते. १ फेब्रुवारी रोजी २१ रुग्ण आढळले, ...

वाढत्या रुग्णसंख्येमुळे जालन्यात जमावबंदी
जानेवारीअखेरपर्यंत जिल्ह्यात दैनंदिन सरासरी १५ हून कमी कोरोना रुग्ण आढळून येत होते. १ फेब्रुवारी रोजी २१ रुग्ण आढळले, तर ७ फेब्रुवारी रोजी ही संख्या २९ वर गेली. यात वाढ होऊन ११ फेब्रुवारीपासून जिल्ह्यात सरासरी ५० हून अधिक रुग्ण आढळून येत आहेत, तर १६ फेब्रुवारी रोजी ५५ रुग्ण आढळले होते. जिल्ह्यात आजवर १४ हजार १८७ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील ३७५ जणांचा मृत्यू झाला असून, १३ हजार ६०६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. एकीकडे कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना लग्नकार्य, राजकीय मेळावे, कार्यक्रम जोमात सुरू आहेत. बाजारपेठेत नियम धाब्यावर बसवून फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. ही बाब पाहता जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू केले आहेत.