धाेकादायक नाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:25 IST2021-01-04T04:25:34+5:302021-01-04T04:25:34+5:30
अतिक्रमणावर कारवाई अंबड : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील अतिक्रमणावर पालिकेकडून कारवाई करण्यात आली. शासकीय जागेवर अतिक्रमण ...

धाेकादायक नाली
अतिक्रमणावर कारवाई
अंबड : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील अतिक्रमणावर पालिकेकडून कारवाई करण्यात आली. शासकीय जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांवर सातत्याने कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले.
दिशादर्शक फलक गायब
जालना : जालना- परतूर मार्गावरील ठिकठिकाणचे दिशादर्शक, सूचनाफलक गायब झाले आहेत. सूचना फलकांअभावी चालकांची कसरत होत असून अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे आवश्यक तेथे सूचनाफलक बसवावेत, अशी मागणी होत आहे.
अवैध दारूविक्री जोमात
घनसावंगी : शहरासह ग्रामीण भागात अवैध दारूविक्री जोमात सुरू आहे. दारूमुळे भांडण- तंट्यात वाढ होत असून महिलांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अवैधरित्या दारूविक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
रस्त्याची दुरवस्था
जालना : शहरातील भोकरदन नाका ते नवीन मोंढा भागात जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला असून रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.