वालसा खालसा येथे मक्याची गंजी जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:30 IST2021-03-31T04:30:35+5:302021-03-31T04:30:35+5:30
फोटो केदारखेडा : भोकरदन तालुक्यातील वालसा-खालसा येथील प्रल्हाद बदर, तुळशीराम खिल्लारे यांच्या शेतातील मक्याच्या गंजीला सोमवारी दुपारी शॉर्टसर्किटमुळे ...

वालसा खालसा येथे मक्याची गंजी जळून खाक
फोटो
केदारखेडा : भोकरदन तालुक्यातील वालसा-खालसा येथील प्रल्हाद बदर, तुळशीराम खिल्लारे यांच्या शेतातील मक्याच्या गंजीला सोमवारी दुपारी शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
वालसा-खालसा शिवारात प्रल्हाद बदर, तुळशीराम खिल्लारे यांची शेती आहे. त्यांनी मक्याची काढणी करून गंजी घातली होती. मक्याच्या गंजीजवळच गव्हाचे काड होते. सोमवारी दुपारी अचानक शॉर्टसर्किटमुळे गव्हाचे काड पेटले. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीत मक्याची गंजी जळून खाक झाली. यासोबतच जनावरांचा चारादेखील जळाला आहे. आग विझविण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न केले. परंतु, आग विझवता आली नाही. या आगीमुळे जवळपास चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे. या आगीत प्रल्हाद बदर, तुळशीराम खिल्लारे, भारत बदर, कैलास बुजाडे आदी शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, सदरील शेत दलित वस्तीला लागून आहे. आग वाढतच असल्याने आगीचे लोळ गावात शिरण्याची भीती ग्रामस्थांना होती. दलित वस्तीत आग शिरू नये यासाठी तरुणांनी जेसीबीद्वारे चारी खोदली. त्यामुळे मोठी हानी टळली.