घरफोड्या करून राज्यात धुमाकूळ घातला, सतत चकवा देऊन फरार झाले, पोलिसांनी शक्कल लढवून घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:47 IST2021-02-23T04:47:22+5:302021-02-23T04:47:22+5:30

जालना : घरफोड्या करून राज्यभरात धुमाकूळ घातलेल्या सराईत गुन्हेगारांना पकडण्यासाठी जालना येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शक्कल लढवून जेरंबद ...

Burglary in the state, constant chakwa fugitives | घरफोड्या करून राज्यात धुमाकूळ घातला, सतत चकवा देऊन फरार झाले, पोलिसांनी शक्कल लढवून घेतले ताब्यात

घरफोड्या करून राज्यात धुमाकूळ घातला, सतत चकवा देऊन फरार झाले, पोलिसांनी शक्कल लढवून घेतले ताब्यात

जालना : घरफोड्या करून राज्यभरात धुमाकूळ घातलेल्या सराईत गुन्हेगारांना पकडण्यासाठी जालना येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शक्कल लढवून जेरंबद केले आहे. पोलिसांना नेहमीच चकवा देणाऱ्या तिघांना एलसीबीच्या तीन पथकांनी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास एकाच वेळी कारवाई करून तिघांना शनिवारी जेरबंद केले आहे. सागरसिंग पिता सुरजसिंग उर्फ फंट्यासिंग अंधरेले, मखनसिंग कृष्णासिंग भादा (दोघे रा. शिकलकरी मोहल्ला, जालना), अर्जुनसिंग छगनसिंग भोंड (२३ रा. वल्ली मामू दर्गा, जालना) व चोरीचे दागिने खरेदी करणारा आकाश कैलास कुलथे (२४ रा. सुवर्णकारनगर) अशी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

जालना शहरातील नळगल्ली येथील अंशुल नरेंद्रकुमार आबड यांचे १४ फेब्रुवारी रोजी चोरट्यांनी घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरून नेली होती. याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. सुभाष भुंजग यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, आरोपी सागरसिंग अंधरेले याने त्याच्या साथीदारांसह सदरील चोरी केली आहे. या माहितीवरून पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी केली असता, त्यात तिन्ही आरोपी दिसून आले. त्यांचे रेकॉर्ड तपासले असता, सदरील आरोपी हे सराईत गुन्हेगार असून, ते पोलिसांना सतत चकवा देत असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी शक्कल लढवून तीन पथके तयार करून शनिवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास एकाच वेळी कारवाई करून सागरसिंग अंधरेले व मखनसिंग भादा या दोघांना शिकलकरी मोहल्ला येथून, तर अर्जुनसिंग छगनसिंग भोंड याला वल्ली मामू येथून ताब्यात घेतले. विचारपूस केली असता, त्यांनी सदरील गुन्ह्याची कबुली दिली. तसेच सोन्या व चांदीचे दागिने हे जालना येथील सराफ आकाश कैलास कुलथे (वय २४ रा. सुवर्णकारनगर ) यास विक्री केल्याचे सांगितले. त्यानंतर आकाश कुलथे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सोन्याची १२० ग्रॅम वजनाची लगड, ९ किलो ९६८ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व रोख रक्कम १,८०,९०० असा एकूण १३,३८,८०६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई पोलीस निरीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, पोलीस उपनिरीक्षक दुर्गेश राजपुत, पोलीस हेडकॉन्स्टेबल हरीष राठोड, प्रशांत देशमुख, किशोर एडके, फुलचंद हजारे, पोलीस नाईक संजय मगरे, मदन बहुरे, रंजित वैराळ, सचिन चौधरी, किशोर पुंगळे, किशोर जाधव, विलास चेके, संदीप मान्टे, कृष्णा तंगे, परमेश्वर धुमाळ, किरण मोरे, रवी जाधव, सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय राऊत, सुरज साठे, रमेश पैठणे, महिला अंमलदार मंदा नाटकर, आशा जायभाये, मंदा बनसोडे, शमशाद पठाण यांनी केली.

सर्वच आरोपींवर राज्यासह परराज्यात गुन्हे दाखल

यातील आरोपी सागरसिंग पिता सुरजसिंग उर्फ फंट्यासिंग अंधरेले याच्यावर राज्यासह परराज्यातही गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर जालना, जळगाव व तेलगांना आदी ठिकाणी तब्बल १९ गुन्हे दाखल आहेत. अर्जुनसिंग छगनसिंग भोंड याच्यावर १८ गुन्हे दाखल आहेत. मखनसिंग कृष्णासिंग भादा यावर एक गुन्हा दाखल आहे. आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने २४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

रिकव्हरीची कबुुली देण्यास टाळाटाळ

या टोळीने राज्यभरात घरफोड्या केल्या आहेत. अनेकवेळा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. परंतु, सदरील आरोपी हे रिकव्हरीची कबुली देत नव्हते. ते आजारी पडल्याचे कारण सांगून टाळाटाळ करीत होते. त्यामुळे हतबल होऊन पोलीस त्यांना सोडून देत होते.

===Photopath===

220221\22jan_37_22022021_15.jpg

===Caption===

आरोपींकडून जप्त केलेल्यादागिन्यांस पोलीस दिसत आहे. 

Web Title: Burglary in the state, constant chakwa fugitives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.