शिंगाडे पोखरी येथे घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:32 IST2021-09-18T04:32:46+5:302021-09-18T04:32:46+5:30

शिंगाडे पोखरी शिवारात दादाराव खरात यांचे घर आहे. ते गुरुवारी रात्री जेवण करून कुुटुंबासह झोपले होते. मध्यरात्री चोरट्यांनी घराच्या ...

Burglary at Shingade Pond | शिंगाडे पोखरी येथे घरफोडी

शिंगाडे पोखरी येथे घरफोडी

शिंगाडे पोखरी शिवारात दादाराव खरात यांचे घर आहे. ते गुरुवारी रात्री जेवण करून कुुटुंबासह झोपले होते. मध्यरात्री चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी १५ हजार रुपये किमतीचे एक मायक्रोटेक कंपनीचे इन्व्हर्टर व युनिको कंपनीची बॅटरी, ८ हजार रुपयांचे चार क्विटंल गहू, ९ हजार रुपये किमतीचा दीड क्विंटल हरभरा, ३ हजार रुपये किमतीची दोन क्विंटल ज्वारी असा ३५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. दादाराव खरात हे सकाळी झोपेतून उठले असता, त्यांना घरात चोरी झाल्याचे समजले. याची माहिती मौजपुरी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी दादाराव वाघ यांच्या फिर्यादीवरून मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोह. वाघ हे करीत आहेत.

राममूर्ती येथून मुद्देमाल लंपास

जालना : घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी ३२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना जालना तालुक्यातील राममूर्ती येथे घडली. चोरट्यांनी १३ हजार रुपये किमतीचा मोबाईल, ५ हजार रुपयांचा मोबाईल, १० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत, ४ हजार रुपये किमतीची चांदी असा ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी विष्णू मगर यांच्या फिर्यादीवरून तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना. बेराडे हे करीत आहेत.

Web Title: Burglary at Shingade Pond