खांडवी येथे घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:21 IST2021-01-01T04:21:20+5:302021-01-01T04:21:20+5:30
खांडवी येथे राहणारे परतूरचे माजी आमदार हरिभाऊ बरकुले हे नेहमीप्रमाणे रात्रीचे जेवण करून झोपले होते. रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास ...

खांडवी येथे घरफोडी
खांडवी येथे राहणारे परतूरचे माजी आमदार हरिभाऊ बरकुले हे नेहमीप्रमाणे रात्रीचे जेवण करून झोपले होते. रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास वाड्यातील एका खोलीचा दरवाजा उघडण्याचा आवाज आल्याने त्यांचे चिरंजीव सूर्यकांत बरकुले जागे झाले. खोलीच्या बाहेर आले. तेव्हा त्यांना वाड्यातील एका खोलीच्या बाहेर तोंडाला रुमाल बांधलेला एक अनोळखी व्यक्ती दिसला. वाड्यातील चौकात इतर तीन जण तोंडाला रुमाल बांधलेले दिसून आले.
सूर्यकांत बरकुले यांनी बंदुकीचा धाक दाखवताच सर्व चोरटे पाठीमागच्या दरवाजाने पळून गेले. त्यानंतर वाड्यातील इतर खोल्यांना लावलेल्या कड्या उघडल्या. मोठा भाऊ चंद्रकांत व इतर सर्वांना जागे केले. घराची पाहणी केली असता पाठीमागील दरवाजाला गिरमिटच्या साहाय्याने पाच छिद्रे पाडल्याचे दिसून आले. इतर खोल्यांची पाहणी केली असता दीड लाख रुपये किमतीचे पाच तोळ्यांचे सोन्याचे गंठण, पंधरा हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी, बारा हजार रुपये किमतीचे कानातील दागिने व इतर काही दागिने तसेच रोख २६ हजार ४०० रुपये असा एकूण २ लाख ४२ हजार १०० रुपयांचा ऐवज लंपास केला.