जाफराबाद येथे घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:21 IST2021-06-11T04:21:03+5:302021-06-11T04:21:03+5:30
जाफराबाद : शहरातील आहिल्यादेवी होळकरनगरमधील अनिल संपत वारे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन लाख रुपयांची रोख रक्कम लंपास ...

जाफराबाद येथे घरफोडी
जाफराबाद : शहरातील आहिल्यादेवी होळकरनगरमधील अनिल संपत वारे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन लाख रुपयांची रोख रक्कम लंपास केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली.
अनिल वारे यांनी आहिल्यादेवी होळकरनगरमध्ये नुकतेच नवीन घराचे काम पूर्ण केले आहे. दोन दिवसांनी वस्तुशांतीचा कार्यक्रम होणार होता. त्यासाठी त्यांनी दोन लाख रुपये घरात असलेल्या लोखंडी पेटीत ठेवले होते. बुधवारी रात्री घरी कोणी नसल्याच्या संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. लोखंडी पेटीत ठेवेलेले दोन लाख रुपये चोरट्यांनी लंपास केले. गुरुवारी सकाळी घरात चोरी झाल्याचे अनिल वारे यांना कळाले. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. या माहितीवरून जाफराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक युवराज पोटरे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा करण्यात आला. या प्रकरणी अनिल वारे यांच्या फिर्यादीवरून जाफराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोनि. रमेश जायभाये हे करीत आहेत.