वन विभागात घरफोडी करणारा जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 00:07 IST2017-12-28T00:07:10+5:302017-12-28T00:07:16+5:30
येथील वनप्रशिक्षण विद्यालयात कार्यरत महिला वनरक्षकांच्या घरात चोरी करणा-या एका संशयितास विशेष कृती दलाच्या पथकाने बुधवारी ताब्यात घेतले.

वन विभागात घरफोडी करणारा जेरबंद
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील वनप्रशिक्षण विद्यालयात कार्यरत महिला वनरक्षकांच्या घरात चोरी करणाºया एका संशयितास विशेष कृती दलाच्या पथकाने बुधवारी ताब्यात घेतले.
राणुबा ऊर्फ राण्या भिकाजी तरकसे (रा. कन्हैयानगर) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. १४ डिसेंबर रोजी वनप्रशिक्षण विद्यालयातील प्रशिक्षणार्थी महिला कर्मचाºयाच्या घरातील मोबाईल, दागिने व रोख रक्कम चोरीस गेल्याची घटना घडली होती.
या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यांतर पोलीस संशयितांचा शोध घेत होते. दरम्यान, विशेष कृती दलाचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांना चोरी करणाºयाबाबत गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार कृती दलाच्या पथकाने बुधवारी राणुका तरकसे यास कन्हैय्यानगर परिसरातून ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडून चोरलेला मोबाईल जप्त केला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, काँस्टेबल एम.बी. स्कॉट, एम.बी. हजारे, एन. बी. कामे, सचिन आर्य, आडेप यांनी ही कारवाई केली.