घरफोडी करणारा चोरटा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:59 IST2021-02-05T07:59:21+5:302021-02-05T07:59:21+5:30

फोटो ओळी आरोपीकडून जप्त केलेल्या मुद्देमालासह पोलीस दिसत आहे. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; ३ लाख ३३ हजार रुपयांचा ...

Burglar arrested | घरफोडी करणारा चोरटा अटकेत

घरफोडी करणारा चोरटा अटकेत

फोटो ओळी

आरोपीकडून जप्त केलेल्या मुद्देमालासह पोलीस दिसत आहे.

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; ३ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

जालना-परतूर तालुक्यातील खांडवी व मंठा तालुक्यातील केंधळी येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास करणा-या चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी जेरबंद केले. उत्तम भीमा गायकवाड (रा. पारधीवाडा, ता. परतूर) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने असा ३ लाख ३३ हजार ४५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

परतूर तालुक्यातील खांडवी येथील सूर्यकांत बरकुले यांच्या राहत्या घरी २८ डिसेंबर रोजी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणी परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, खांडवी येथील घरफोडी उत्तम गायकवाड याने साथीदारांसोबत केलेली आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांना खब-यामार्फत मिळाली होती.

या माहितीवरून उत्तम गायकवाड याला परतूर येथून ताब्यात घेतले. त्याला सदरील गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता, त्याने खांडवी व केंधळी येथे साथीदारांच्या मदतीने घरफोडी केल्याची कबुली दिली. तसेच राणीवाहेगाव येथून दुचाकी लंपास केल्याचेही सांगितले. त्याच्याकडून ३ लाख २३ हजार ४५५ रुपयांचे दागिने व १० हजार रुपये किमतीची दुचाकी असा ३ लाख ३३ हजार ४५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, पोलीस उपनिरीक्षक दुर्गेश राजपूत, पोहेकॉ. किशोर एडके, सॅम्युअल कांबळे, प्रशांत देशमुख, पोलीस नाईक कृष्णा तंगे, सागर बाविस्कर, जगदीश बावणे, सचिन चौधरी, किशोर पुंगळे विलास चेके, देवीदास भोजणे, रवी जाधव, मंदा बनसोडे आदींनी केली.

Web Title: Burglar arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.