दानवेंच्या राजकीय प्रवासाला बुलेट ट्रेनची गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:21 IST2021-07-10T04:21:43+5:302021-07-10T04:21:43+5:30
जालना ते खामगाव मार्गाकडे लक्ष जालना ते खामगाव रेल्वे मार्ग, तसेच सोलापूर ते जळगाव हा प्रस्तावित रेल्वेमार्ग पूर्ण करण्याचे ...

दानवेंच्या राजकीय प्रवासाला बुलेट ट्रेनची गती
जालना ते खामगाव मार्गाकडे लक्ष
जालना ते खामगाव रेल्वे मार्ग, तसेच सोलापूर ते जळगाव हा प्रस्तावित रेल्वेमार्ग पूर्ण करण्याचे मोठे आव्हान रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या समोर आहे. एकीकडे बुलेट ट्रेनचे सर्वेक्षण सुरू असल्याने जालना ते खामगाव हा मार्ग होतो की, बारगळतो याचे स्पष्टीकरण महत्त्वाचे ठरणार आहे. सोलापूर ते जळगाव या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण झाले आहे. तो जालन्यातून नेल्यास रेल्वेचे कोट्यवधी रुपये वाचणार आहेत; परंतु तो औरंगाबादहून न्यावा असा आग्रह औरंगाबादकरांनी धरला आहे. त्यामुळे दानवे हे या मुद्यावर फारसे लक्ष देणार नाहीत. कारण पैठणसह अन्य भाग हा त्यांच्या लोकसभा मतदारसंघात येत असल्याने त्यासाठी ते यावर फारसे लक्ष देतील याबाबत शंका घेतली जात आहे.