बांधकामाची भिंत पाडून साहित्य लांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:20 IST2021-07-08T04:20:44+5:302021-07-08T04:20:44+5:30
मंगळवारी राजूर येथील गट नं. २०९ मधील गणेश बाबूराव खरात (रा. राजूर) यांच्या वडिलांच्या नावे असलेल्या प्लॉट नं. १०६६ ...

बांधकामाची भिंत पाडून साहित्य लांबविले
मंगळवारी राजूर येथील गट नं. २०९ मधील गणेश बाबूराव खरात (रा. राजूर) यांच्या वडिलांच्या नावे असलेल्या प्लॉट नं. १०६६ च्या बांधकामावर संशयित आरोपींनी संगनमत करुन भिंत पाडून शटरचा कोंडा तोडून आतील दहा जुन्या दुरुस्तीसाठी आणलेल्या टीव्ही, कॅश काउंटर टेबल, दोन खुर्च्या आदी साहित्याचे नुकसान केले. तसेच काउंटरमधील जुनी बिले, बांधकामासाठीच्या अँकर बोल्टच्या सहा गोण्या यांची अंदाजे किंमत पंच्याहत्तर रुपयाचे नुकसान केले. याप्रकरणी खरात यांनी हसनाबाद पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी प्रल्हाद येडूबा पुंगळे, लक्ष्मण प्रल्हाद पुंगळे (रा. राजूर), आकाश फुके, बाबासाहेब फुके, गंभीर फुके (तिघे रा. वजिरखेडा) संभाजी गणेश सपकाळ (रा. राजूर) बाबासाहेब उत्तम ठोंबरे (रा.चांधई ठोंबरे) गजानन त्रिंबक इंगळे, बाबासाहेब दामू इंगळे (दोघे रा. सिरसगाव इंगळे) व एका महिलेविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि संतोष घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार शिवाजीराव देशमुख अधिक तपास करत आहेत.
गोदामात ४० हजारांची चोरी
जालना : देऊळगावराजा रोडवरील सिटीजन ढाब्याच्या मागे असलेल्या एका गोदामाचे शटर उचकटून चोरट्यांनी जनरेटरचे डायनोमा व जुनी पाण्याची मोटार, असा एकूण ४४ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. मंगळवारी रात्री ही घटना घडली. या प्रकरणी गेंदालाल राजाराम झुंगे (रा. हनुमानघाट) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक वाव्हळे अधिक तपास करत आहेत.