भोकरदन शहरातील जीर्ण इमारत कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 00:56 IST2018-03-15T00:50:17+5:302018-03-15T00:56:35+5:30
भोकरदन शहरातील सादत चौक परिसरातील दोन मजली जीर्ण झालेली इमारत मंगळवारी कोसळली आहे़ इमारतीचा काही भाग कोसळ्या नंतर नगर परिषदेच्या वतीने ही इमारत पाडण्यात आली आहे़

भोकरदन शहरातील जीर्ण इमारत कोसळली
ल्ोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : भोकरदन शहरातील सादत चौक परिसरातील दोन मजली जीर्ण झालेली इमारत मंगळवारी कोसळली आहे़ इमारतीचा काही भाग कोसळ्या नंतर नगर परिषदेच्या वतीने ही इमारत पाडण्यात आली आहे़
सादत चौक परिसरात अनेक वर्ष जुनी दुमजली इमारत होती. या इमारतीमध्ये कोणीही वास्तव्य करीत नव्हते. मात्र इमारतीशेजारी नागरी वास्तव्य होते. शिवाय लागूनच बेकरीचे दुकान आहे. याठिकाणी अनेक कामगार दररोज काम करीत असतात. त्यामुळे या इमारतीपासून धोका निर्माण झाला होता. या संदर्भात नगर परिषदेला अनेकवेळा माहिती देण्यात आली होती. मात्र परिषदेने याकडे दुर्लक्ष केले. शेवटी १३ मार्च रोजी दुपारी या इमारतीचा काही भाग बेकरीच्या छतावर पडला. सुदैवाने या ठिकाणी असलेल्या दोन मजुरांनी पळ काढला. त्यामुळे दुर्दैवी घटना टळली. त्यानंतर याची माहिती परिषदेच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर तात्काळ जे़सी़बी लावून उर्वरित इमारत पाडण्यात आलीे़ याच इमारती मध्ये कुत्र्याचे लहान पिल्ले होते. त्याचा आवाज आल्यानंतर त्यांना बाहेर काढले. शहरातील जीर्ण इमारती, गढ्या, नगर परिषदेने उतरवून घ्याव्यात, अशी मागणी होत आहे़