बीएसएनएल कर्मचाऱ्यांचे आंदोलन

By Admin | Updated: November 28, 2014 01:10 IST2014-11-28T00:02:12+5:302014-11-28T01:10:18+5:30

जालना : तृतीयश्रेणी व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा प्रलंबित मागण्या तात्काळ सोडवा, या मागणीसाठी बीएसएनएल कर्मचाऱ्यांनी गुरूवारी लाक्षणिक उपोषण केले

BSNL employees' agitation | बीएसएनएल कर्मचाऱ्यांचे आंदोलन

बीएसएनएल कर्मचाऱ्यांचे आंदोलन


जालना : तृतीयश्रेणी व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा प्रलंबित मागण्या तात्काळ सोडवा, या मागणीसाठी बीएसएनएल कर्मचाऱ्यांनी गुरूवारी लाक्षणिक उपोषण केले. आंदोलकांनी दूरसंचार कार्यालयासमोर धरणे दिली.
सर्व कर्मचाऱ्यांना बोनस लागू करा, दैनंदिन मजदूर व गु्रप डी यांचे स्टँगनेशन, १ जानेवारी २०१३ ला लागलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगारातील तफावत दूर करा, एनईपीपी मधील शंका व अडचणींचे समाधान करा, अनुकंपा आधारे नोकरीतील अडचणी दूर करा, एलटीसी, रजेचा पगार, मेडिकल अलाऊन्स पुन्हा सुरू करा, थेट भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना ३० टक्के पेन्शनचा लाभ द्या, कॉल सेंटरचे आऊटसोर्सिंग बंद करा इत्यादी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
बीएसएनएल मधील सर्व नॉन एक्जिक्युटिव्ह कामगारांच्या युनियन व असोसिएशन यांच्या संयुक्त कृती समितीतर्फे हे आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.
कृती समितीबरोबर झालेल्या तीन तासाच्या प्रदीर्घ चर्चेनंतर सुद्धा कर्मचाऱ्यांची एकही मागणी बीएसएनएल व्यवस्थापन मान्य करायला तयार नाही. त्यामुळे लाक्षणिक संप करण्यात आल्याचे समितीचे जिल्हा सचिव संजय वाखारकर व विजय साबळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: BSNL employees' agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.