शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
2
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
3
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
4
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
5
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
6
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
7
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
10
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
11
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
12
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
13
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
14
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
15
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
16
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
17
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
18
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
19
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
20
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीच्या वादातून भावानेच केला बहिणीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:32 IST

जालना : शहरातील चौधरीनगर परिसरात मंगळवारी दुपारी एका ५५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला होता. सदरील महिलेची ओळख पटली असून, ...

जालना : शहरातील चौधरीनगर परिसरात मंगळवारी दुपारी एका ५५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला होता. सदरील महिलेची ओळख पटली असून, या महिलेचा खून जमिनीच्या वादातून लहान भावानेच केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी संशयित आरोपी दीपक पटेकर यास ताब्यात घेतले आहे.

कमलाबाई शाहूराव कोल्हे (५५ रा. खापोली, मुंबई) असे मृत महिलेचे नाव आहे. कमलाबाई कोल्हे यांना तीन भाऊ व तीन बहिणी आहे. त्यांच्या वडिलांची अंबड तालुक्यातील आपेगाव येथे दीड एकर जमीन आहे. सदरील जमीन त्यांच्या मधल्या भावाने आपल्या नावावर केली होती. हे प्रकरण न्यायालयात दाखल करण्यात आले होते. यावर दोन दिवसांपूर्वीच अंबड येथील न्यायालयात सुनावणी होती. यासाठी कमलाबाई कोल्हे या मुंबई येथून चंदनझिरा येथील मोठ्या भावाकडे आल्या होत्या. खरपुडी येथील लहान भाऊ दीपक पटेकर हादेखील चंदनझिरा येथे आला होता. सोमवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास दीपक पटेकर हा कमलबाई यांना घेऊन चौधरीनगर परिसरात गेला होता तेथेच त्याने गळा दाबला तसेच दगडाने मारून कमलाबाई यांचा खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाले, पोनि. बागुल, पोलीस उपनिरीक्षक बघाट, पोलीस उपनिरीक्षक बोंडले, पोलीस कर्मचारी अनिल काळे, चंद्रकांत माळी आदींनी केली आहे.

असा झाला उलगडा

मोठ्या भावाने चंदनझिरा पोलीस ठाण्यात कमलाबाई कोल्हे या बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. त्यातच चौधरीनगर परिसरात ५५ वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी अधिक तपास केला असता, सदरील मृतदेह हा कमलाबाई कोल्हे यांचा असल्याचे स्पष्ट झाले. अधिक तपास केला असता, सोमवारी रात्री ७ ते १ वाजेपर्यंत दीपक पटेकर हा घरी नसल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली असता, त्याने खुनाची कबुली दिली.