नयनरम्य आतषबाजीने डोळ्यांचे पारणे फिटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 01:02 IST2019-10-09T01:01:46+5:302019-10-09T01:02:20+5:30
विजया दशमीनिमित्त शहरातील जेईएस महाविद्यालयाच्या प्रांगणात मंगळवारी रात्री ५१ फुटी रावण दहन करण्यात आले.

नयनरम्य आतषबाजीने डोळ्यांचे पारणे फिटले
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : विजया दशमीनिमित्त शहरातील जेईएस महाविद्यालयाच्या प्रांगणात मंगळवारी रात्री ५१ फुटी रावण दहन करण्यात आले. यावेळी करण्यात आलेल्या आतषबाजीने नागरिकांच्या डोळ्याचे पारणे फेडले.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री खा. रावसाहेब दानवे, आ. अर्जुन खोतकर, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, माजी आमदार कैलास गोरंट्याल, भास्कर दानवे, उद्योजक कैलास लोया, दिलीप सहाणे, विजय दाड, विनित सहाणे, प्राचार्य जवाहर काबरा, रमेशचंद्र तौरवाला, सिध्दीविनायक मुळे, विष्णू वाघमारे यांच्यासह शहरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी लेझीम पथकातील युवतींनी सादर केलेल्या कलाविष्काराने उपस्थितांची मने जिंकली.