पुलाचे काम प्रगतीपथावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:32 IST2021-02-24T04:32:16+5:302021-02-24T04:32:16+5:30

पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य जालना : जालना- भोकरदन महामार्गावरील गिरीजा-पूर्णा नदी पात्रावरील पुलावर डांबर उखडल्याने ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या ...

Bridge work in progress | पुलाचे काम प्रगतीपथावर

पुलाचे काम प्रगतीपथावर

पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य

जालना : जालना- भोकरदन महामार्गावरील गिरीजा-पूर्णा नदी पात्रावरील पुलावर डांबर उखडल्याने ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या शिवाय पुलाचे कठडे ही जागोजागी तुटले असून, दुरूस्ती करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार

पारडगाव : येथील सुभेदार बाबा मंदिर जवळ रोहित्राला मंजुरी मिळालेली होती. मात्र, महावितरण कंपनीची अधिकारी, ग्रामस्थांनी सुभेदार बाबा मंदिर जवळ मंजूर झालेले रोहित्र शेतात नेऊन बसवले. या बाबत तक्रार अर्ज माजी सरपंच रवींद्र ढेरे, ग्रामपंचायत सदस्य अनिल सातपुते यांनी घनसांवगी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात दिला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन

शहागड: अंबड तालुक्यातील काही शेतकऱ्यांना गोदावरी नदीवर मुख्यमंत्री सौर कृषी पंप मंजूर झालेले आहे; परंतु संबंधित कंपनी नियमानुसार सर्व साहित्य देत नाही. याकडे लक्ष द्यावे, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा नामदेव घोडके, मुक्ताबाई शेलकर यांनी दिला आहे.

वीस दिवसाआड पाणीपुरवठा

बदनापूर : बदनापूर नगरपंचायतच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहरात २० ते २५ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. तर दुसरीकडे जागोजागी पाईपलाईन फुटल्याने पाणी वाया जात आहे. त्यामुळे न.प.च्या या कारभारामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही वेळेवर पाणी मिळत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.

वीस दिवसाआड पाणीपुरवठा

बदनापूर : बदनापूर नगरपंचायतच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहरात २० ते २५ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. तर दुसरीकडे जागोजागी पाईपलाईन फुटल्याने पाणी वाया जात आहे. त्यामुळे न.प.च्या या कारभारामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही वेळेवर पाणी मिळत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.

समन्वयकपदी मुरली सुरासे यांची निवड

जालना : महाएनजीओ फेडरेशनच्या महाराष्ट्र राज्य समन्वयकपदी मुरली सुरासे व लक्ष्मण मदन यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक मुख्य संयोजक शेखर मुंदडा, मुख्य समन्वयक विजय वरुडकर यांनी केली आहे. महाएनजीओ फेडरेशच्या अतंर्गत २ हजार पेक्षा जास्त संस्था कार्यरत आहेत. या संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्य करण्यासाठी प्रयत्न केल्या जात आहे. या निवडीचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे.

योजनेसाठी प्रस्ताव सादर करा

जालना: मत्स्य व्यवसायात शाश्वत आणि जबाबदार विकासाच्या माध्यमातून निलक्रांती घडवून आणण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या योजनेची अंमलबजावणी २०२०-२०२१ ते २०२४-२०२५ या पाच आर्थिक वर्षांमध्ये करण्यात येणार आहे. या योजनेचा २०२१-२०२२ साठीचा कृती आराखडा शासनास सादर करावयाचा आहे. लाभार्थींनी योजनेचा १५ दिवसांच्या आत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले.

रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

जालना : शिवजन्मोत्सव समिती व स्वराज्य मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नूतन वसाहत येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री अर्जुन खोतकर, जिल्हा विशेष सरकारी अभियोक्ता दीपक कोल्हे, संतोष गाजरे, अरविंद देशमुख, अशोक पडूळ, राजू काणे, अभिमन्यू खोतकर हे उपस्थित होते.

Web Title: Bridge work in progress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.