कसुरा नदीवरील पूल बनला धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:35 IST2021-09-08T04:35:51+5:302021-09-08T04:35:51+5:30

पुण्यतिथीनिमित्त अभिवादन मठपिंपळगाव : जालना तालुक्यातील गोलापांगरी येथे संत सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. याप्रसंगी परमेश्वर ...

The bridge over the Kasura River became dangerous | कसुरा नदीवरील पूल बनला धोकादायक

कसुरा नदीवरील पूल बनला धोकादायक

पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

मठपिंपळगाव : जालना तालुक्यातील गोलापांगरी येथे संत सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. याप्रसंगी परमेश्वर गवळी, पंडित गवळी, मोरेश्वर गवळी, नवनाथ गवळी, रघुनाथ गवळी, बाबासाहेब गवळी, बळीराम गवळी, सिद्धेश्वर गवळी यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

व्हीएसएसमध्ये शिक्षक दिन साजरा

जालना : येथील व्हीएसएस महाविद्यालयात माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद मदन यांच्या हस्ते डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाईची मागणी

जालना : शहरात अवैध दारूविक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. तळीरामांमुळे भांडण- तंट्यात वाढ होत असून, कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. शिवाय महिला, मुलींनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देऊन कारवाई मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.

वाटूर फाटा येथे वाहतूककोंडी

परतूर : तालुक्यातील वाटूर फाटा येथे दर मंगळवारी जयपूर रोडवर आठवडे बाजार भरत असतो. या बाजारामुळे वाहतुकीची कोंडी होऊन परिसरातील नागरिकांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीने बाजाराला पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले. या निवेदनावर मनसे विद्यार्थी सेनेचे सिद्धेश्वर काकडे, ज्ञानेश्वर जाधव, भरत मोगरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

वाटूर येथील शाळेत शिक्षकांचा गौरव

वाटूर : परतूर तालुक्यातील वाटूर येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय व्यवस्थापन समिती व आधार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यात आली आहे. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मारोती वायाळ, एकनाथ राऊत, गणेश खरात, मुख्याध्यापक संपत आढे, चित्रकला बिरादार, गणेश चव्हाण, राहुल सरकटे, प्रकाश आढे आदींची उपस्थिती होती.

भोरजार यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार

जालना : तालुक्यातील पीरकल्याण केंद्रांतर्गत असलेल्या अहंकार देऊळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सहशिक्षिका सुशील हिरामण भोरजार यांनी शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात केेलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन इनरव्हिल क्लब ऑफ जालना होरायझनच्या वतीने त्यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी सपना गर्ग, आरती भक्कड, शोभा इंगळे, अमृता मिश्रीकोटकर, पूनम खंडेलवाल, जयमंगल जाधव, मंगेश जैवाळ, सुनील ढाकरके आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Web Title: The bridge over the Kasura River became dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.