पूल बनला धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 01:05 IST2020-02-13T01:04:40+5:302020-02-13T01:05:15+5:30
शहरातील नवीन मोंढा येथून कन्हैय्या नगर भागाकडे जाणारा पूल धोकादायक झाला आहे.

पूल बनला धोकादायक
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरातील नवीन मोंढा येथून कन्हैय्या नगर भागाकडे जाणारा पूल धोकादायक झाला आहे. या पुलाचे संरक्षक कठडे गायब झाले असून, अपघाताचा धोका वाढला आहे.
शहरासह परिसरातील राज्य मार्गावरील, शहरांतर्गत भागातील अनेक पूल धोकादायक झाले आहेत. विशेषत: नवीन मोंढा येथून कन्हैय्या नगरकडे जाणाऱ्या मार्गावरील पुलाची अवस्था बिकट झाली आहे. या मार्गावर सतत वाहनांची वर्दळ असते. विशेषत: रात्रीच्यावेळी या पुलावरून वाहतूक करताना चालकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. तरी संबंधितांनी लक्ष देऊन या पुलाला संरक्षक कठडे बसवावेत, अशी मागणी होत आहे.