क्राइमच्या महत्त्वाच्या बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:43 IST2021-01-08T05:43:10+5:302021-01-08T05:43:10+5:30
जालना : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आयशरमधून चोरट्यांनी ५६०० रुपये किमतीचे ७० लिटर डिझेल चोरून नेल्याची घटना बुधवारी मध्यरात्री ...

क्राइमच्या महत्त्वाच्या बातम्या
जालना : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आयशरमधून चोरट्यांनी ५६०० रुपये किमतीचे ७० लिटर डिझेल चोरून नेल्याची घटना बुधवारी मध्यरात्री वाघ्रूळ येथे जालना ते देऊळगावराजा रोडवर घडली. याप्रकरणी शेख सलमान शेख रफिक यांच्या फिर्यादीवरून तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोना. लांडगे करीत आहेत.
ट्रकची पेट्रोलपंपाच्या मशीनला धडक
जालना : भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक (एमएच- १२ सीटी- ५९४७) ने अंबड- शहागड रोडवरील पेट्रोलपंपाच्या मशीनला धडक दिल्याची घटना बुधवारी घडली. यात पेट्रोलपंपचालकाचे ९० हजार रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी विनोद चौधरी यांच्या फिर्यादीवरून दिनेश लक्ष्मण माने (रा. बीड) याच्याविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोना. चव्हाण करीत आहेत.
एमआयडीसी परिसरातून पाण्याचे टँकर चोरीस
जालना : शहरातील एमआयडीसी परिसरात उभे केलेले पाण्याचे टँकर चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना १ जानेवारी रोजी घडली. याप्रकरणी अली बिन सय्यद चाऊस यांच्या फिर्यादीवरून चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोउपनि. बोंडले करीत आहेत.