महत्वाच्या बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:42 IST2021-01-08T05:42:17+5:302021-01-08T05:42:17+5:30
चिमुकल्यांना मास्क, बिस्कीटसचे वाटप जालना : येथील श्री भगवानबाबा बालिका आश्रमातील चिमुकल्यांना रविवारी मास्क, नाष्टा व बिस्कीटसचे वाटप करण्यात ...

महत्वाच्या बातम्या
चिमुकल्यांना मास्क, बिस्कीटसचे वाटप
जालना : येथील श्री भगवानबाबा बालिका आश्रमातील चिमुकल्यांना रविवारी मास्क, नाष्टा व बिस्कीटसचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी इंडियन ह्युमन राईट असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष पांडुरंग नरवडे, भन्ते करुणानंद, मिलिंद ठोंबरे, संध्या ठोंबरे, महेंद्र ठोंबरे, अभिजित शेजवळ, आशालता शेजवळ, आचल शेजवळ, रमाई फाऊंडेशनच्या शोभा खाडे आदींची उपस्थिती होती.
फोटो
जि.प. शाळेत सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
जालना : देवमुर्ती येथील जि.प. प्रा. शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी महिला शिक्षकांचा सत्कार देखील करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक पी. आर. काळे, समता शिक्षक संघाचे जिल्हा सचिव परमेश्वर साळवे, गणेश चव्हाण, भीमराव भालेराव, संदीप बागल, गौतम गवई, अशोक चावरे, मुकीत कुरेशी, नफीसा बाजी, आशा लंके आदींची उपस्थिती होती.