अहमदनगर येथे प्रांतपाल हरिष मोटवानी यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा झाला. कोरोना काळात जालन्यातील अनेक गाव आणि शहरात रेनबोने भरीव समाजोपयोगी कार्यक्रम राबवले. अध्यक्ष स्मिता भक्कड आणि सचिव डॉ. प्रशांत पळणीटकर यांच्या नेतृत्वाखाली रोटरी रेनबोने अनेक उल्लेखनीय प्रकल्प राबवले. त्याचीच प्रचिती या पुरस्कार वितरण सोहळ्यात पाहायला मिळाली. रेनबोला त्यांच्या पब्लिक इमेज या क्षेत्रातील सीना नदीवरील पुलाच्या कार्यासाठी प्रांतात प्रथम पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. ऑक्सिजन सिलिंडर दुरुस्तीसाठी केलेले काम आणि कोरोना लसीकरणासाठी क्लबने केलेल्या कामासाठीही रेनबोने पुरस्कार जिंकला. उत्कृष्ट प्रांतपाल म्हणून गोविंदराम मंत्री, इंटरनॅशनल सर्व्हिससाठी डॉ. नितीन खंडेलवाल, प्रांत सचिव म्हणून केलेल्या कार्यासाठी डॉ. सुरेश साबू, पर्यावरण क्षेत्रातील कार्यासाठी वर्षा पित्ती, एज्यू फेस्टमधील कार्यासाठी महेश माळी यांना पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
रोटरी रेनबोची पुरस्कार वितरण सोहळ्यात बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:34 IST