शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

ग्रंथदिंडीने ग्रंथमहोत्सवास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 12:59 AM

जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित तीन दिवसीय जिल्हास्तरीय ग्रंथ महोत्सवाला सोमवारी सुरुवात झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित तीन दिवसीय जिल्हास्तरीय ग्रंथ महोत्सवाला सोमवारी सुरुवात झाली. यानिमित्त सकाळी काढण्यात आलेल्या गं्रथदिंडीत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.सकाळी ९.३० वाजता जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी हिरवी झेंडी दाखवून ग्रंथदिंडीची सुरूवात करण्यात आली. यावेळी शिक्षणाधिकारी एम.एस. चौधरी, पी.एल. कवाणे, उपशिक्षणाधिकारी मंगल धुपे, रमेश तांगडे आदींची उपस्थिती होती. मोतीबागेपासून सुरू झालेल्या ग्रंथदिंंडीचा जिल्हा परिषद मुलांची शाळा येथे समारोप झाला. यामध्ये मत्स्योदरी माध्यमिक विद्यालय, इंदेवाडी, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, संस्कार प्रबोधिनी माध्यमिक विद्यालय, नंदकिशोर सहानी विद्यालय, किनगावकर माध्यमिक विद्यालय, जालना उर्दू हास्कूल आदी शाळांतील विद्यार्थी सहभागी झाले होते. ग्रंथ दिंडीत पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या मत्स्योदरी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गं्रथमहोत्सवानिमित्त जि.प. माध्यमिक शाळा येथे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी आवर्जुन सहभाग घेतला. दुपारच्या सत्रात अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर आयोजित परिसंवादात प्रा.डॉ. बसवराज कोरे व सोनवटकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मंगळवारी साहित्यिक आपल्या भेटीला, तर २८ रोजी विद्यार्थ्यांसाठी ग्रंथ हेच गुरु व विज्ञाननिष्ठ समाज या विषयावर वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. महोत्सवासाठी उपशिक्षणाधिकारी मंगल धुपे, जिल्हा समन्वयक पी.के. शिंदे, मुख्याध्यापक कुंडलकर, राजेंद्र कायंदे, एस.एम. देशमुख, गौतम वाव्हळ, डॉ. सुहास सदावर्ते, डॉ. सुशील सूर्यवंशी, संतोष लिंगायत, जगत घुगे, कुंडलकर, संजय कायंदे, एम.एस. जोशी आदी परिश्रम घेत आहेत.

टॅग्स :literatureसाहित्यzpजिल्हा परिषद