निराधार योजनेतील बोगस लाभार्थ्यांची आता खैर नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:00 IST2021-02-05T08:00:33+5:302021-02-05T08:00:33+5:30

जालना : बोगस कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक करणाऱ्या निराधार योजनेतील बोगस लाभार्थ्यांचा शोध घेतला जात आहे. यामुळे आता ...

The bogus beneficiaries of the Niradhar scheme are no longer doing well | निराधार योजनेतील बोगस लाभार्थ्यांची आता खैर नाही

निराधार योजनेतील बोगस लाभार्थ्यांची आता खैर नाही

जालना : बोगस कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक करणाऱ्या निराधार योजनेतील बोगस लाभार्थ्यांचा शोध घेतला जात आहे. यामुळे आता बोगस लाभार्थ्यांची खैर नाही.

निराधार नागरिकांचे जगणे सुसह्य व्हावे, यासाठी शासनाकडून निराधार नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. निराधार व्यक्ती पूर्णपणे दुसऱ्यांच्या भरवशावर जगत असल्याने योजनांचा लाभ देण्याबरोबरच त्यांना आर्थिक मदतही करणे आवश्यक आहे, जेणेकरून त्या पैशाचा उपयोग औषध खरेदी करण्याबरोबरच दैनंदिन गरजांवर करता येतो, परंतु काही जण बोगस कागदपत्र सादर करून या योजनाचा लाभ घेत असल्याचे शासनाच्या लक्षात आले. त्यानंतर, आता सर्वच लाभार्थ्यांची तहसील कार्यालयामार्फत तपासणी केली जात आहे. यातून बोगस लाभार्थ्यांचा शोध घेतला जात आहे.

शासनाने निराधार योजनीतील बोगस लाभार्थ्यांचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, तहसील कार्यालयांना आदेश दिले असून, बोगस लाभार्थ्यांचा शोध घेतला जात आहे. यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल वाचले.

राजू शिंदे, तहसीलदार

योजनानिहाय लाभार्थी

योजनेचे नाव लाभार्थी संख्या

संजय गांधी निराधार अनुदान योजना २९,६५३

श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना ८३,९२६

इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती योजना ५१,३०३

------------

Web Title: The bogus beneficiaries of the Niradhar scheme are no longer doing well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.