कठड्याला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 00:21 IST2018-01-21T00:21:37+5:302018-01-21T00:21:40+5:30
पिंपळीधामणगावकडे (ता.परतूर) जात असताना जांबसमर्थ येथील बनाची नदीच्या पुलावर कठड्याला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.

कठड्याला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू
कुंभारपिंपळगाव : येथून पिंपळीधामणगावकडे (ता.परतूर) जात असताना जांबसमर्थ येथील बनाची नदीच्या पुलावर कठड्याला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.
परतूर तालुक्यातील पिंपळीधामणगाव येथील संदीपान पराजी शिर्के (४५) हे दुचाकीने (एमएच-२१ अह ९५४३) शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास गावाकडे जात होते. भरधाव दुचाकी बनाचीवाडी नदीवरील कठड्याला धडकल्याने शिर्के यांचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी सकाळी ग्रामस्थांनी रस्त्यावर मृतदेह व दुचाकी बघितल्यानंतर पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.