विहिरीत आढळला ४९ वर्षीय इसमाचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:00 IST2021-02-05T08:00:14+5:302021-02-05T08:00:14+5:30
भोकरदन : एका शेतातील विहिरीत सडलेल्या अवस्थेत ४९ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आल्याची घटना भोकरदन तालुक्यातील कुंभारी येथे शुक्रवारी ...

विहिरीत आढळला ४९ वर्षीय इसमाचा मृतदेह
भोकरदन : एका शेतातील विहिरीत सडलेल्या अवस्थेत ४९ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आल्याची घटना भोकरदन तालुक्यातील कुंभारी येथे शुक्रवारी उघडकीस आली. सुनील एकनाथ दळवी (वय ४९ रा. कुंभारी ता. भोकरदन) असे मयताचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुंभारी शिवारातील रवींद्र सहाने यांच्या शेतातील विहीरीत शुक्रवारी सायंकाळी अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच भोकरदन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढला. चार ते पाच दिवसांपासून हा इसम विहिरीत पडल्याने मृतदेह पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे ओळख पटविणे अवघड झाले होते. मात्र, मृतदेहाच्या उजव्या हातावर नाव गोंधलेल असल्याने त्याची ओळख पटली असून, हा मृतदेह कुंभारी गावातील सुनिल एकनाथ दळवी यांचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सी.पी.काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रुस्तुम जैवळ, अभिजित वयकोस, गणेश पिंपळकर हे करीत आहेत.