शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सहा तासांच्या शोध मोहिमेनंतर सापडले मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 01:04 IST

जालना तालुक्यातील कुंभेफळ येथील साठवण तलावात पाच तरूण पोहण्यासाठी मंगळवारी गेले होते. त्यातील दोन तरूणांना पोहता येत नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना तालुक्यातील कुंभेफळ येथील साठवण तलावात पाच तरूण पोहण्यासाठी मंगळवारी गेले होते. त्यातील दोन तरूणांना पोहता येत नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. दरम्यान मंगळवारी रात्र झाल्याने त्या बुडालेल्या तरूणांचा शोध घेणे शक्य झाले नव्हते. बुधवारी सकाळी जालन्यातील अग्निशमन दलाने सकाळी दहा वाजेला बोटीव्दारे सुरू केलेली शोध मोहीम सहा तास चालली. एका युवकाचा मृतदेह साडेबारा वाजेच्या दरम्यान तर दुसऱ्या युवकाचा मृतदेह साडेचार वाजता सापडल्याचे अग्निशमन दलाचे सहायक अधिकारी ज्ञानेश्वर जाधव यांनी सांगितले.मंगळवारी कुंभेफळसह जालन्यातील पाच तरूण हे पोहण्यासाठी म्हणून कुंभेफळ येथील साठवण तलावावर गेले होते. त्यातील नारायण राठोड ( १८. रा. चंदनझिरा ) व नवनाथ प्रभाकर जाधव (१८, कुंभेफळ) या दोन जणांना पोहता येत नसताना त्यांनी खोल पाण्यात जाऊन पोहण्याचा प्रयत्न केला. त्यातच ते बुडाले. या दुर्घटनेत दोन तरूण बुडाल्याची माहिती उपसरपंच शिरसाट यांनी अग्निशमन दल तसेच तहसीलदारांना कळवली. त्यानंतर तहसीलदार भुजबळ यांनी तातडीने हालचाल करत, मंडळ अधिकारी हरि गिरी आणि तलाठी गिरी यांना घटनास्थळी रवाना केले होते.परंतु सायंकाळ झाल्याने अग्निशमन अधिकाऱ्यांनी शोध मोहीम करणे शक्य नसल्याचे सांगितले. त्यावरून ग्रामस्थ संतप्त झाले होते. परंतु माजी मंत्री अर्जुन खोतकरांनी यात मध्यस्थी करून ग्रामस्थांचा रोष कमी केला. ही घटना दुर्दैवी आहे, परंतु आता अंधार झाल्याने मृतदेहांचा शोध घेणे शक्य नसल्याचे खोतकरांनी सांगितले. ही शोधमोहीम बुधवारी सकाळी हाती घेण्यात आली. सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत अग्निशमन दलाच्या अधिकारी, कर्मचा-यांनी बोटीव्दारे गळ टाकून या मृतदेहांचा शोध घेऊन हे दोन्ही मृतदेह तलावाबाहेर काढले. यावेळी त्या मयतांचे आई-वडील आणि नातेवाईकांनी हंबरडा फोडला. मृतदेह बाहेर काढल्यावर सर्वत्र शोकाकुल वातावरण निर्माण झाले होते. या कामी कुंभेफळ येथील ग्रामस्थांची मोठी मदत झाली.या शोध मोहिमेत अग्निशमन विभागाचे ज्ञानेश्वर जाधव, अब्दुल बासेद, सागर गडकरी, बोट आॅपरेटर नजीर चौधरी, विठ्ठल कांबळे, रवी बनसोडे, राहुल नरवडे, संतोष काळे, किशोर सगट, कुंदन पाटोळे, पंजाबराव देशमुख यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेWaterपाणीDeathमृत्यूSwimmingपोहणे