६१ जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:32 IST2021-02-24T04:32:05+5:302021-02-24T04:32:05+5:30
तीर्थपुरी येथील आरोग्य केंद्रात बैठक तीर्थपुरी : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर येथील आरोग्य केंद्रात बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा ...

६१ जणांचे रक्तदान
तीर्थपुरी येथील आरोग्य केंद्रात बैठक
तीर्थपुरी : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर येथील आरोग्य केंद्रात बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष महेंद्र पवार, कैलास अंडील, पंचायत समिती सभापती भागवत रक्ताटे, उपसभापती बन्सीधर शेळके, डॉ. संतोष कडले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच नागरिकांनी प्रशासकीय सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाटूर केंद्रात बैठक
वाटूर फाटा : येथील आरोग्य केंद्रात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी झेड. एच. सय्यद यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. बैठकीस डॉ. सचिन वायाळ, डॉ. चेतन पेरे, सरपंच कमल केशरखाणे, ग्रामसेवक शंकर चव्हाण, विक्रम माने, पोना रवींद्र बीरकायलू, संजय भातने, अन्सारी आदींची उपस्थिती होती.
पिंपळगावात स्वच्छता मोहिमेस प्रतिसाद
भोकरदन : तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने माझं गाव, सुंदर गाव उपक्रमांतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी विस्ताराधिकारी जी.एस. पाखरे, ग्रामविकास अधिकारी बी. जी. सुरडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी स्वच्छतेचे महत्त्व विषद केले. कार्यक्रमास ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य, कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.