तीर्थपुरीत ४० जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:26 IST2021-01-09T04:26:05+5:302021-01-09T04:26:05+5:30

तीर्थपुरी : येथील मत्स्योदरी कला महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ४० जणांनी रक्तदान केले. हा कार्यक्रम पालकमंत्री राजेश ...

Blood donation of 40 people in Tirthpuri | तीर्थपुरीत ४० जणांचे रक्तदान

तीर्थपुरीत ४० जणांचे रक्तदान

तीर्थपुरी : येथील मत्स्योदरी कला महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ४० जणांनी रक्तदान केले. हा कार्यक्रम पालकमंत्री राजेश टोपे यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्र‌वारी घेण्यात आला. दरम्यान अनेकांची रक्त तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन समर्थचे उपाध्यक्ष उत्तमराव पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जि.प. उपाध्यक्ष महेंद्र पवार, सभापती तात्यासाहेब चिमणे, शैलेंद्र पवार, शिवसेना उपजिल्हा प्रमुख श्रीकृष्ण बोबडे, मेहेरनाथ बोबडे, सतीश पवार, घनश्याम चिमणे, राजू चिमणे, प्राचार्य, राजेंद्र गायकवाड, शिवराज लाखे, मुख्याध्यापक सुनील अंभोरे, विलास एसलोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. शिबिरात महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह ग्रामस्थांची रक्त तपासणी बरोबर आरोग्यसंदर्भात इतर चाचण्या करण्यात आल्या. यावेळी डॉ. राजेंद्र गाडेकर, डॉ. प्रशांत बादल, डॉ. रुबिना, डॉ. राठोड, रंजना राठोड, विद्या राठोड यांची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी डॉ. भगवानसिंह बैनाडे, डॉ. सुनील खांडेभराड, प्रा. रमेश जोगदंड, डॉ. प्रबोधन कलंब, डॉ. प्रदीप जाधव, डॉ. प्रदीप लगड, डॉ. अंकुश चव्हाण, राहुल कांबळे, प्रा. पांडुरंग दगडे, अतुल भालेकर, श्यामसुंदर बांड, विनायक चव्हाण, डॉ. सुशीलकुमार शिंदे यांनी प्रयत्न केले.

Web Title: Blood donation of 40 people in Tirthpuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.