नेर येथील शिबिरात ३५ दात्यांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:32 IST2021-02-24T04:32:12+5:302021-02-24T04:32:12+5:30
अंबड येथील न्यायालय परिसरात वृक्षारोपण अंबड : येथील अतिरिक्त न्यायालय परिसरात रविवारी वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी तहसीलदार विद्याचरण ...

नेर येथील शिबिरात ३५ दात्यांचे रक्तदान
अंबड येथील न्यायालय परिसरात वृक्षारोपण
अंबड : येथील अतिरिक्त न्यायालय परिसरात रविवारी वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी तहसीलदार विद्याचरण कडवकर, प्रा. डॉ. दिगंबर भुतेकर, प्रा. रवींद्र पैठणे, अमर लाहोटी, डॉ. रोहित भाला, कैलास राठी, देवानंद चित्राल, ॲड. मंडलीक, ॲड. लक्ष्मण गायके, घायतडक, ॲड. कृष्णा शर्मा, ॲड. वसंत गायकवाड, ॲड. नारायण शेळके आदींची उपस्थिती होती.
अवैध वाळू उपसा; प्रशासनाचे दुर्लक्ष
मंठा : तालुक्यातील देवठाणा उस्वद, वझर सरकटे, लिंबखेडा, कानडी आदी वाळू घाटातून अवैधरित्या वाळूचा उपसा, वाहतूक सुरू आहे. राजरोस सुरू असलेल्या अवैध वाळू, उपशाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. अवजड वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढला असून, रस्तेही खराब होत आहेत. त्यामुळे अवैध वाळू वाहतूक रोखण्याची मागणी होत आहे.
घनसावंगी पंचायत समितीमध्ये सभा
घनसावंगी : येथील पंचायत समितीच्या सभागृहात सभापती भागवत रक्ताटे यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. यावेळी उपसभापती बन्सीधर शेळके, गटविकास अधिकारी एम. जी. जाधव, सहायक गटविकास अधिकारी शेखर देशमुख, कक्ष अधिकारी व्ही.डी. मान्टे यांच्यासह सदस्य, अधिकारी उपस्थित होते.
अध्यक्षपदी मते तर सचिवपदी मुकणे
तीर्थपुरी : येथील मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी राहुल मते तर सचिवपदी शिवाजी मुकणे यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष साईनाथ पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुनील शेळके, जितेंद्र लखोटीया, सारडा, धनंजय वझरकर यांच्यासह औषध विक्रेत्यांची उपस्थिती होती.