करंजाळा येथील शिबिरात ३१ जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:46 IST2021-02-23T04:46:36+5:302021-02-23T04:46:36+5:30
वडीगोद्री : अंबड तालुक्यातील करंजाळा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ...

करंजाळा येथील शिबिरात ३१ जणांचे रक्तदान
वडीगोद्री : अंबड तालुक्यातील करंजाळा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, ३१ जणांनी रक्तदान केले.
जालना येथील श्री स्वामी समर्थ रक्तपेढीच्या वतीने रक्तसंकलन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. शासनाने रक्तदान करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. त्यातच मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असल्याने येथील तरुणांनी डीजे न वाजवता रक्तदान शिबिराचे आयोजन करून शिवजयंती साजरी केली. या शिबिरात ३१ जणांनी रक्तदान केले. या प्रसंगी तालुकाध्यक्ष विनोद नांद्रे, सोसायटीचे चेअरमन बाबासाहेब नांद्रे, ग्रामपंचायत करंजाळाचे सरपंच विठ्ठल धुमक, उपसरपंच नामदेव सटाले, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर आमटे, भास्कर नांद्रे, गणेश तेलगड, राजेंद्र नांद्रे, नितीन नांद्रे, तात्यासाहेब नांद्रे, शंकर नांद्रे, ज्ञानेश्वर प्रधान, बाळू वावरे, भगवान धुमक, युवराज शिंदे, बाबुराव वाघमारे, गणेश नांद्रे, दत्ता नांद्रे, राम सावंत, गणेश आमटे, लहू शिंदे आदींची उपस्थिती होती.
===Photopath===
210221\21jan_49_21022021_15.jpg
===Caption===
रक्तदान केलेल्या तरूणांनी प्रमाणपत्र देण्यात आले.